शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आता ‘शिवशाही’ने करा आवडेल तेथे प्रवास, दोन प्रकारात पास योजना; चार ते सात दिवसांचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 19:24 IST

खासगी वाहतुकीसोबत स्पर्धा करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने आधुनिक सुविधा देणारी शिवशाही बससेवा सुरू केली आहे. या गाडीची वाढती मागणी पाहता महामंडळाच्यावतीने ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ ही योजना आता ‘शिवशाही’ गाडीसाठीसुद्धा सुरू केली आहे.

ठळक मुद्देकॅशलेस प्रवास आता शिवशाहीतूनशिवशाहीचा पास प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात येणारप्रतिपास पाच रुपये अपघात साहाय्यता निधीची आकारणी आंतरराज्य मार्गावरील पास महाराष्ट्र राज्यातसुद्धा वैध

कोल्हापूर : खासगी वाहतुकीसोबत स्पर्धा करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने आधुनिक सुविधा देणारी शिवशाही बससेवा सुरू केली आहे. या गाडीची वाढती मागणी पाहता महामंडळाच्यावतीने ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ ही योजना आता ‘शिवशाही’ गाडीसाठीसुद्धा सुरू केली आहे. त्यामुळे कॅशलेस प्रवास आता शिवशाहीतून मिळणार आहे.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून प्रवाशांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात. ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ या योजनेअंतर्गत प्रवास करणारा प्रवासीवर्ग मोठा आहे. या प्रवाशांनाही ‘शिवशाही’ने प्रवास करता यावा, या उद्देशाने ‘आवडेल तिथे कोठेही प्रवास’ योजनेअंतर्गत शिवशाहीचा देखील पास प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या गाडीसाठी चार व सात दिवसांसाठी पास योजना असेल. तसेच गर्दीचा हंगाम आणि कमी गर्दीचा हंगाम असे दोन प्रकारचे पास दिले जातात. तसेच पासच्या मूल्याव्यतिरिक्त प्रतिपास पाच रुपये अपघात साहाय्यता निधीची आकारणी केली जाणार आहे. हे पासेस फक्त ‘शिवशाही’ आसनी बससेवेकरिता ग्राह्य राहतील.

‘शिवशाही’ शयन बससेवेतून या पासवर प्रवास करता येणार नाही. हा पास निम्म दर्जाच्या बससेवेसाठी (साधी, जलद, रात्रसेवा, शहरी, मिडीबस, निमआराम) वैध राहील. आंतरराज्य मार्गावरील पास महाराष्ट्र राज्यातसुद्धा वैध राहील.

असे आहेत दरगर्दीचा हंगाम : १५ आॅक्टोबर ते १४ जूनकमी गर्दीचा हंगाम : १५ जून ते १४ आॅक्टोबर

७ दिवसांच्या पासाचे मूल्यशिवशाही                           गर्दीचा हंगाम                          कमी गर्दीचा हंगाम   

                                            प्रौढ           मुले                          प्रौढ          मुलेशिवशाही आसनी                 १७८०            ८९०                         १६४५      ८२५शिवशाही आंतरराज्य मार्ग   १९२०           ९६०                        १७८०       ८९०

४ दिवसांच्या पासाचे मूल्यशिवशाही                                 गर्दीचा हंगाम                            कमी गर्दीचा हंगाम                                                 प्रौढ                मुले                     प्रौढ                 मुलेशिवशाही आसनी                       १०२०            ५१०                       ९४०               ४७०शिवशाही आंतरराज्य मार्ग         ११००              ५५०                     १०२०              ५१० 

 

टॅग्स :Shivshahiशिवशाहीkolhapurकोल्हापूर