आता इंटरनेटवरही निकाल
By Admin | Updated: November 1, 2015 00:32 IST2015-10-31T23:55:22+5:302015-11-01T00:32:13+5:30
महापालिका निवडणूक : मतमोजणीची तयारी पूर्ण; पाच ठिकाणी स्पीकरची व्यवस्था

आता इंटरनेटवरही निकाल
कोल्हापूर : महापालिकेच्या निवडणुकीसाठी उद्या, सोमवारी मतमोजणी होणार असून, त्याची तयारी प्रशासनाने शनिवारीच पूर्ण केली. सर्व ८१ प्रभागांची मतमोजणी शासकीय तंत्रनिकेतनमध्ये होणार आहे. मतमोजणीचा निकालही तत्काळ स्पीकरवरून व इंटरनेटच्या माध्यमातून जाहीर केला जाणार आहे. याकरिता सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
सात विभागीय निवडणूक कार्यालयांतर्गत सात ठिकाणी सरासरी ११ किंवा १२ प्रभागांची एकत्रित मोजणी केली जाणार आहे. मतमोजणीच्या ठिकाणी ३५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत, तर संपूर्ण मतमोजणीसाठी स्वतंत्र २६७ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक
निकाल ज्या-त्या विभागीय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अखेरची सही झाल्यानंतर निवडणूक निरीक्षकांकडे सुपूर्द केला जाणार आहे.
विद्यापीठ, कळंबा फिल्टरचा पहिला गुलाल
शासकीय तंत्रनिकेतनमध्ये उद्या, सोमवारी सकाळी दहा वाजता मतमोजणीस प्रारंभ होणार आहे. लोकसभा व विधानसभेची मतमोजणी ही सकाळी आठ वाजता सुरू होते. कारण त्यांची मतमोजणी मतदानानंतर लगेच दुसऱ्या दिवशी नसते. एक दिवसाची मध्ये सुटी असते; परंतु महापालिकेसाठी आज, रविवारी मतदान आहे व लगेच दुसऱ्या दिवशी सोमवारी मतमोजणी होत आहे. त्यामुळे त्यांना मतमोजणीच्या कामासाठी पोहोचण्यात अडचणी येऊ नयेत म्हणून सकाळी दहा वाजता मतमोजणीस प्रारंभ होणार असल्याचे महापालिकेच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले.
महापालिकेचे एकूण ८१ प्रभाग असले तरी प्रत्येक प्रभागात जितकी मतदान केंद्रे असतील, तितक्या मतमोजणीच्या फेऱ्या होतील. प्रत्येक प्रभागात सरासरी तीन ते सहा केंद्रे आहेत. शिवाजी विद्यापीठ-कृषी महाविद्यालय (प्रभाग क्रमांक ६४) आणि कळंबा फिल्टर हाऊस (प्रभाग क्रमांक ६८) या प्रभागांत प्रत्येकी तीन केंद्रे असल्याने या दोन प्रभागांचा निकाल सकाळी अकरा वाजताच जाहीर होईल. पहिला अर्धा तास टपालाची मतमोजणी होईल. त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणी सुरू होईल. त्यामुळे दुपारी एक वाजेपर्यंत सगळा निकाल जाहीर होईल.
मोबाईलवरही अॅप
एखाद्या मतदाराला आपले मतदान केंद्र कोठे आहे हे पाहण्यासाठी महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरून मोबाईलसाठी अॅपही तयार केले आहे. नाव आणि क्षेत्र त्यात घातले की आपले मतदान केंद्र किती अंतरावर, कोठे आहे, याची माहिती मिळेल. उमेदवाराची संपत्ती, गुन्हे याची माहिती ‘पोलिंग बुथ व्होटर’ या अॅपद्वारे मिळणार आहे. निकाल ६६६.‘ेू येथेही पाहण्यास मिळणार आहेत.