आता हयातीच्या दाखल्यासाठी ‘केवायसी’ अनिवार्य ठरणार

By Admin | Updated: November 26, 2014 00:33 IST2014-11-26T00:33:19+5:302014-11-26T00:33:44+5:30

महा-ई सेवा केंद्र : सेवानिवृत्तांना निवृत्ती मानधन

Now KYC will be mandatory for the issuing certificate | आता हयातीच्या दाखल्यासाठी ‘केवायसी’ अनिवार्य ठरणार

आता हयातीच्या दाखल्यासाठी ‘केवायसी’ अनिवार्य ठरणार

रत्नागिरी : सेवानिवृत्तांना निवृत्ती मानधन घेण्यासाठी बँकांकडून हयातीचा दाखला घ्यावा लागतो. मात्र, आता या हयातीच्या दाखल्यासाठी ई केवायसी अनिवार्य केली जाणार आहे. त्यामुळे ही सुविधा लवकरच महा-ई सेवाकेंद्रांमधून सुरू होणार आहे. मात्र, यासाठी आधारकार्ड अनिवार्य ठरणार आहे.
सर्व शासकीय, निमशासकीय सेवानिवृत्तांना निवृत्तिवेतनासाठी बँकांकडून हयातीचा दाखला द्यावा लागतो. मात्र, आता हा दाखला मिळण्यासाठीही केवायसी अनिवार्य करण्यात येणार आहे. केवायसी असेल तरच बँकांकडून हयातीचा दाखला दिला जाणार आहे. यासाठी आधारकार्डही अनिवार्य आहे.
आधारकार्ड असेल तरच केवायसी केली जाणार आहे. ही केवायसी आधार क्रमांकासोबत बँकांशी संलग्न केल्यानंतरच सेवानिवृत्तांना बँक हयातीचा दाखला देणार आहे. त्यामुळे आता हयातीचा दाखला ज्यांच्याकडे केवायसी असणार आहे, अशांनाच मिळणार आहे. त्यामुळे अशा सेवानिवृत्तांसाठी महा ई केंद्रातून ई केवायसी सुविधा पुरविली जाणार आहे. ई केवायसी आधार क्रमांकासोबत बॅँकांशी संलग्न केल्यानंतर त्यांना हयातीचा दाखला लगेचच मिळू शकेल.
सेवानिवृत्तांसाठी हयातीच्या दाखल्यासोबत केवायसी अर्ज मागवण्यात आले आहेत.
रत्नागिरीतही महा ई सेवा केंद्रांकडून ही सुविधा पुरविण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून आधारकार्डचे काम करणाऱ्या स्पॅन्को कंपनीच्या माध्यमातून या कंपनीच्या अखत्यारितील सुमारे महा ई सेवा केंद्रांमधून ई केवायसी सुविधा आठवडाभरात सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Now KYC will be mandatory for the issuing certificate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.