शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आता आमचं ठरलं...मदतीची परतफेड दक्षिणेत करू : मंडलिकप्रेमींची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 11:52 IST

लोकसभा निवडणुकीत प्रा. संजय मंडलिक यांना खासदार करण्यात तुम्ही केलेले सहकार्य कागलची जनता कधीही विसरणार नाही. आता आमचंबी ठरलंय.. तुमच्या मदतीची परतफेड दक्षिणेत करू, तुम्ही कधीही हाक द्या, अशी ग्वाही मंडलिकप्रेमी जनतेने आमदार सतेज पाटील यांना गुरुवारी येथे दिली.

ठळक मुद्देआता आमचं ठरलं...मदतीची परतफेड दक्षिणेत करूसतेज पाटील यांचा कागलच्या जनतेकडून सत्कार

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत प्रा. संजय मंडलिक यांना खासदार करण्यात तुम्ही केलेले सहकार्य कागलची जनता कधीही विसरणार नाही. आता आमचंबी ठरलंय.. तुमच्या मदतीची परतफेड दक्षिणेत करू, तुम्ही कधीही हाक द्या, अशी ग्वाही मंडलिकप्रेमी जनतेने आमदार सतेज पाटील यांना गुरुवारी येथे दिली.

मुरगूडचे नगराध्यक्ष राजेखान जमादार यांच्या नेतृत्वाखाली सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्याचे संचालक व विविध गावच्या सरपंचांसह शिष्टमंडळाने येथील हॉटेल सयाजीमध्ये आमदार पाटील यांचा सत्कार केला. कागलच्या जनतेच्या वतीने मंडलिक यांच्या विजयासाठी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानण्यात आले.शाल, पुष्पगुच्छ देऊन आपल्या भावना व्यक्त करताना जमादार यांनी कागलची जनता तुमच्या ऋणात राहील, तुम्ही कधीही बोलवा, आम्ही येऊ, असा विश्वास दिला. आमदार पाटील यांनीही आता दक्षिणेत तुमची आम्हाला मदत लागणार आहे, येथे जरा जास्त लक्ष घाला. विकासकामासाठी सहकार्य करा, असे आवाहन केले, याला प्रतिसाद देऊन जमादार यांच्यासह शिष्टमंडळानेही आम्ही स्वत: तुमच्या प्रचारात लक्ष घालू, असे आश्वासित केले.

जवळपास अर्धा तास चाललेल्या या आभार सोहळ्यात विजयाचा लेखाजोखा मांडतानाच भविष्यातील राजकीय सहकार्याच्या जोडण्या लावण्यात आल्या. शिष्टमंडळात मंडलिक कारखान्याचे उपाध्यक्ष बंडोपंत चौगले, संचालक मसू पाटील, आप्पासाहेब तांबेडकर, विश्वासराव कुराडे, कैलास जाधव, पंचायत समिती सदस्य राहुल महाडिक, प्रदीप चव्हाण, सरपंच विक्रम जाधव, दादा पाटील, शेखर सावंत, नंदू पाटील यांचा समावेश होता.

 

टॅग्स :Sanjay Mandalikसंजय मंडलिकkolhapurकोल्हापूरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील