आता डिजिटल फलक प्रिंटिंग करणाऱ्यावरच थेट गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:05 IST2021-01-13T05:05:42+5:302021-01-13T05:05:42+5:30
कोल्हापूर : ज्या डिजिटल फलकांना महापालिका, पोलीस प्रशासनाने परवानगी दिली आहे, अशा फलकांचेच प्रिंटिंग संबंधित प्रिंटिंग व्यावसायिकांना करावे लागणार ...

आता डिजिटल फलक प्रिंटिंग करणाऱ्यावरच थेट गुन्हा
कोल्हापूर : ज्या डिजिटल फलकांना महापालिका, पोलीस प्रशासनाने परवानगी दिली आहे, अशा फलकांचेच प्रिंटिंग संबंधित प्रिंटिंग व्यावसायिकांना करावे लागणार आहे. परवानगी न घेता फलकाचे प्रिंटिंग केल्यास संबंधित प्रिंटिंग व्यावसायिकांवर थेट गुन्हा दाखल होणार आहे. शहरात विनापरवाना फलक लावून शहराचे विद्रुपीकरण होत असल्यामुळे प्रशासनाकडून हा निर्णय घेतला आहे. यामुळे विनापरवाना डिजिटल फलक, शुभेच्छा फलक, स्वागत फलक लावणाऱ्यांना चपराक बसणार आहे.
तात्पुरत्या स्वरुपातील जाहिरात फलक, शुभेच्छा फलक तसेच श्रध्दांजली फलक ज्या क्षेत्रामध्ये लावणार आहे, त्या क्षेत्रातील विभागीय कार्यालय यांच्याकडून रितसर परवानगी घेऊन जाहिरात फलक लावावे लागणार आहेत. विनापरवाना, अनधिकृत जाहिरात फलक लावणाऱ्या व्यक्ती, संस्था यांच्यावर महाराष्ट्र मालमत्तेो विद्रुपीकरण अधिनियमाअंतर्गत कारवाई केली जाणार आहे.
प्रतिक्रिया
फलक लावणाऱ्यांनी प्रथम वाहतूक नियंत्रण शाखा आणि फलक लावणाऱ्या परिसरातील पोलीस ठाण्याची एनओसी घ्यावी लागणार आहे. ही एनओसी दाखवून महापालिकेतील इस्टेट विभागातून रितरस फी भरुन फलक लावण्याची परवानगी घ्यावी लागेल. ही सर्व कागदपत्रे तपासून प्रिंटिंग व्यावसायिकांनी फलकाचे प्रिंटिंग करायचे आहे. परवानगीशिवाय प्रिंटिंग केल्यास सबंधितांवर गुन्हे दाखल होणार आहेत.
पंडित पोवार, अतिक्रमण निर्मूलन पथकप्रमुख महापालिका
प्रिंटिंग मशीन जप्त
फलकावर कोणता मजकूर, छायाचित्र असणार, याची तपासणी पोलीस प्रशासन करणार आहे. यानंतरच एनओसी दिली जाणार आहे. पोलीस प्रशासनाची एनओसी आणि महापालिकेच्या परवानगीशिवाय फलक लावला असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित फलकाचे डिझाईन करणारा, प्रिंटिंग करणारा आणि फलक लावणारा यांच्यावर गुन्हा दाखल होणार आहे. केवळ गुन्हा दाखल होऊन हे थांबणार नसून, संबधितांचे प्रिटिंग मशीनच जप्त केले जाणार आहे.
चौक़ट
इच्छुकांना दणका
महापालिका निवडणुकीसाठी अनेकजण इच्छुक असून, त्यांनी प्रभागात फलक लावणे सुरू केले आहे. येथून पुढेही असे फलक वाढण्याची शक्यता आहे. आता विनापरवाना फलकाचे प्रिंटिंग करणाऱ्यांवर कारवाई होणार असल्यामुळे इच्छुकांनाही परवानगी घेऊनच फलक लावावे लागणार आहे. यामुळे महापालिकेचे उत्पन्न वाढणार असून, शहर विद्रुपीकरण करणारेही वटणीवर येणार आहेत.