शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
5
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
6
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
7
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
8
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
9
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
10
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
11
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
12
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
13
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
14
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
15
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
16
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
17
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
18
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

Kolhapur: आता मी एकटा.. तुम्ही सोबत आहात ना?; सतेज पाटील यांची 'गोकुळ'च्या संस्था प्रतिनिधींना भावनिक साद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 18:59 IST

आगामी जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीला आपण महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच सामोरे जाणार

गडहिंग्लज: गेली २५ वर्षे मी जिल्ह्याच्या राजकारणात आहे.परंतु, राजकारणात नेहमी संघर्ष करावा लागतो. कुठल्यातरी 'पंचवार्षिक'ला सगळे माझ्यासोबत असतात, एखाद्या 'पंचवार्षिक'ला मी एकटा असतो. आता मी एकटा आहे, तुम्ही सगळे माझ्यासोबत आहात ना ? अशी थेट विचारणा करत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी जिल्हा दूध संघ तथा गोकुळच्या संस्था प्रतिनिधींना भावनिक साद घातली.'गोकुळ'च्या संचालिका अंजना रेडेकर यांच्या येथील निवासस्थानी आजरा व गडहिंग्लज तालुक्यातील दूध संस्था प्रतिनिधींच्या बैठकीत ते बोलत होते. काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस व गडहिंग्लज कारखान्याचे संचालक विद्याधर गुरबे, गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष रामदास पाटील,राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अमर चव्हाण, शिवप्रसाद तेली, मल्लिकार्जुन आरबोळे, अजित बंदी आदी उपस्थित होते.पाटील म्हणाले, आगामी जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीला आपण महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच सामोरे जाणार आहोत. गडहिंग्लज नगरपालिकेच्या निवडणुकीत जनता दलही आपल्या सोबत असणार आहे. यावेळी अंजना रेडेकर यांनी केदारी रेडेकर संस्था समूह आणि 'गोकुळ'च्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. अँड.दिग्विजय कुराडे यांनी प्रास्ताविक केले.अनिरूध्द रेडेकर यांनी आभार मानले.

'गोकुळ'मध्ये एकटे पडल्याची कबुली!अलिकडेच झालेल्या 'गोकुळ'च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत  महायुतीचे जिल्ह्यातील सर्व नेते एकत्र आले.त्यामुळे अध्यक्षपदाची संधी मंत्री हसन मुश्रीफ यांचे सुपुत्र नवीद मुश्रीफ यांना मिळाली आणि सतेज पाटील समर्थक निशिकांत पाटील - चुयेकर यांचे नाव मागे पडले.त्यानंतर 'गोकुळ'ची आगामी निवडणूक देखील 'महायुती'म्हणूनच लढविण्याच्या हालचाली सुरू आहेत.त्यामुळे 'गोकुळ'च्या राजकारण ते एकटे पडल्याची चर्चा होती.त्याची कबुली स्वत: त्यांनीच यावेळी दिली.

गडहिंग्लजमध्ये 'ज.द'ही सोबत !गडहिंग्लज नगरपालिकेची निवडणुकदेखील महाविकास आघाडी ताकदीने लढवणार असून जनता दलही आपल्या सोबत असणार आहे,असे सतेज पाटील यांनी जाहीर केले.दरम्यान, बैठकीनंतर त्यांनी जनता दलाचे माजी उपनगराध्यक्ष नितीन देसाई,सागर पाटील यांच्याशीही गडहिंग्लज नगरपालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा केली.