आता ३५ ते ४४ वयोगटातील नागरिकांची लसीकरण केंद्रावर नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:29 IST2021-09-17T04:29:42+5:302021-09-17T04:29:42+5:30

कोल्हापूर : महानगरपालिकेमार्फत आज, शुक्रवारी ३५ ते ४४ वयोगटातील नागरिकांची लसीकरण केंद्रावर नोंदणी करून कोविशिल्डच्या पहिल्या डोसचे लसीकरण ...

Now citizens in the age group of 35 to 44 are registered at the vaccination center | आता ३५ ते ४४ वयोगटातील नागरिकांची लसीकरण केंद्रावर नोंदणी

आता ३५ ते ४४ वयोगटातील नागरिकांची लसीकरण केंद्रावर नोंदणी

कोल्हापूर : महानगरपालिकेमार्फत आज, शुक्रवारी ३५ ते ४४ वयोगटातील नागरिकांची लसीकरण केंद्रावर नोंदणी करून कोविशिल्डच्या पहिल्या डोसचे लसीकरण करण्यात येणार आहे. नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.

आज, शुक्रवारी कोविशिल्डचा पहिला डोस प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र सावित्रीबाई फुले, फिरंगाई, राजारामपुरी, महाडिक माळ, आयसोलेशन, फुलेवाडी, सदर बाजार, सिद्धार्थनगर, मोरेमानेनगर या केंद्रांवर देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेऊन २८ दिवस झालेल्या व्यक्तींना प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र पंचगंगा, कसबा बावडा व कदमवाडी येथील द्वारकानाथ कपूर दवाखाना या ठिकाणी कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोसचे लसीकरण करण्यात येणार आहे.

शहरात ३०२८ नागरिकांचे लसीकरण-

गुरुवारी प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविशिल्डचे ३०२८ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. यामध्ये फ्रंट लाइन वर्कर २७ व १८ ते ४५ वर्षापर्यंत २१६९ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. तर ४५ ते ६० वर्षापर्यंत ६२३ नागरिकांचे व ६० वर्षावरील २०९ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.

Web Title: Now citizens in the age group of 35 to 44 are registered at the vaccination center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.