शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

आता विंटेज वाहनांना नवीन नंबर, कोल्हापुरात एकूण 'इतकी' वाहने

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2022 15:49 IST

अनेकांनी आजोबा-पणजोबांची आठवण, तर काहींनी हौस म्हणून अशी ७० ते ७५ वर्षांपूर्वीच विंटेज वाहने जपून ठेवली आहेत.

सचिन भोसलेकोल्हापूर : विंटेज कार तसा अमूल्य ठेवा आणि अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय होय. त्या इतके वर्षे जपून आणि सुस्थितीत ठेवणे तसे जिकिरीचे काम आहे. अनेकांनी आजोबा-पणजोबांची आठवण, तर काहींनी हौस म्हणून अशी ७० ते ७५ वर्षांपूर्वीच विंटेज वाहने जपून ठेवली आहेत. आता मात्र त्यांचे विंटेज असण्याची खूण असलेले त्या काळातील नंबर पडद्याआड जाऊन नवीन नंबर त्यांना मिळणार आहेत.यासाठी केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने केंद्रीय मोटार वाहन नियमावली १९८९ नुसार अशा वाहनांची पुनर्नोंदणी आणि नवीन क्रमांक घेणे बंधनकारक केले आहे. त्यासाठी नवी ८ आकडी व्हीए सिरीज आणली आहे. या वाहनांची आरसी बुक जमा करून नवीन स्मार्ट कार्ड दिले जाणार आहे.१९५० पूर्वीची सात विंटेज कारकोल्हापूर शहरात १९५० पूर्वीची सात वाहने आहेत. त्यातील दोन वाहनांची नव्या नियमाप्रमाणे नोंदणी झाली आहे.

१९६० पूर्वीची १० क्लासिक कारकोल्हापूर जिल्ह्यात १९६० पूर्वीची एकूण १० क्लासिक वर्गवारीतील वाहने उपलब्ध आहेत.

साठनंतरची वाहने -३केवळ तीन विंटेज दुचाकी उपलब्ध

जिल्ह्यात सद्य:स्थितीत तीन विंटेज दुचाकी उपलब्ध आहेत. त्यातील ८ जून व २५ एप्रिल १९४९ आणि २० नोव्हेंबर १९४६ अशी या दोन दुचाकींची उत्पादन तारीख आहे.

  • ६० वर्षांपूर्वीच्या क्लासिक दुचाकी संख्या - १७
  • ६० नंतरच्या क्लासिक दुचाकी संख्या -९ 

नव्या नंबरला २० हजारांचा फटकानव्या नियमाप्रमाणे ८ अंकी क्रमांकासाठी २० हजार पुनर्नोंदणीसाठी शुल्क आहे.

वेगळेपण दूर होणार

या कारचे एमटीसी, बीवायएन, एमएचके, एमएचएम, बीवायएच, एमएचव्ही-०००० असे क्रमांक होते. आता हे क्रमांक एमएचव्हीएएए ०००० असे वेगळे होणार आहेत.

अँटिक वाहन म्हणून आरटीओने वेगळे क्रमांक दिले. ही बाब स्वागतार्ह आहे. त्यामुळे जुन्या विंटेज कार म्हणून आजच्या जमान्यातही एक प्रकारे वेगळी ओळख कायम राहणार आहे. - विजय बुधले, उद्योजक व विंटेज कार मालक

केंद्र शासनाच्या नव्या नियमानुसार विंटेज वाहने जसजशी पुनर्नोंदणीसाठी येतील, त्याप्रमाणे ८ आकडी नवीन क्रमांक त्या वाहनांना दिला जात आहे. जेणेकरून त्याचे वेगळेपण जपले जाईल. - रोहित काटकर, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, कोल्हापूर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcarकार