आता २५ टक्के कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:25 IST2021-07-31T04:25:24+5:302021-07-31T04:25:24+5:30

कोल्हापूर : कोरोनामुळे सलग दुसऱ्यावर्षी राज्य शासनाने शासकीय सेवेतील २५ टक्के कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात याव्यात, असा आदेश सामान्य प्रशासन ...

Now 25 per cent of the employees will be transferred | आता २५ टक्के कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार

आता २५ टक्के कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार

कोल्हापूर : कोरोनामुळे सलग दुसऱ्यावर्षी राज्य शासनाने शासकीय सेवेतील २५ टक्के कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात याव्यात, असा आदेश सामान्य प्रशासन विभागाने काढला आहे. या आदेशानुसार बदलीची प्रक्रिया ९ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. कोरोना सुरू झाल्यानंतर राज्य शासनाने ९ जुलैला १५ टक्के कर्मचाऱ्यांची बदली करण्याचा आदेश काढला होता. आता त्यात आणखी १० टक्क्यांनी वाढ करून २५ टक्के बदल्या कराव्यात, अशी अधिसूचना गुरुवारी काढली आहे. यात बदलीसाठी कोणते निकष लावायचे याचा सूचनेत उल्लेख करण्यात आलेला नाही. या आदेशानुसार बदलीची प्रक्रिया झाल्यानंतर जी पदे रिक्त राहतील त्यावर विशेष कारण असल्यास ३० ऑगस्टपर्यंत बदल्या करण्यात येणार आहेत. त्या दहा टक्क्यापर्यंत कराव्यात, असे या आदेशात म्हटले आहे.

---

Web Title: Now 25 per cent of the employees will be transferred