शहरं
Join us  
Trending Stories
1
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
2
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
3
देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी
4
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
5
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
6
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
7
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
8
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
9
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
10
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
11
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
12
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
13
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
14
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
15
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
16
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
17
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
18
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
19
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
20
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!

ग्रामपंचायतीची इमारत होणार चकाचक, बांधकामासाठी आता १०० टक्के अनुदान

By समीर देशपांडे | Updated: December 7, 2023 13:33 IST

मातोश्री ग्रामपंचायत योजनेच्या अनुदानात वाढ

समीर देशपांडेकोल्हापूर : बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेच्या अनुदानात वाढ करण्यात आली आहे. तसेच यासाठी असणारी ग्रामपंचायत स्वनिधीची अटही रद्द करण्यात आली आहे.तत्कालीन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या काळात ज्या ग्रामपंचायतींना स्वतंत्र इमारत नाही अशा ग्रामपंचायतींना निधी देण्यासाठी ही योजना आखण्यात आली होती. याआधी ज्या ग्रामपंचायतींच्या कामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यांनाही या नव्या आदेशानुसार निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

अशी आहे बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनाज्या ग्रामपंचायतींना स्वत:ची इमारत नाही अशा ग्रामपंचायतींना इमारत बांधण्यासाठी अनुदान देण्याची ही योजना आहे. २०१४ नंतर महाराष्ट्रात आलेल्या भाजप, शिवसेना युती सरकारने ही योजना राबवली होती. यामध्ये तीन प्रकारची लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना वेगवेगळ्या रकमेचे अनुदान देण्यात येत होते.

योजनेला मुदतवाढयुती सरकारनंतर महाविकास आघाडी सरकार आले होते. परंतु त्यानंतर या योजनेला मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. आता सन २०२७-२८ पर्यंत या योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे.

आधी किती मिळायचे अनुदान?आधीच्या योजनेतून १ हजार लोकसंख्येपेक्षा कमी लोकसंख्या, एक ते दोन हजार लोकसंख्या आणि दोन हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावांच्या ग्रामपंचायतींना अनुक्रमे १२, १८ आणि १८ लाख रुपये मूल्य शासनाने निश्चित केले होते. यासाठी अनुक्रमे १० लाख ८० हजार, १५ लाख ३० हजार आणि १४ लाख ४० हजार असे अनुदान दिले जात होते, तर उर्वरित अनुक्रमे एक लाख ८० हजार रुपये, २ लाख ७० हजार आणि ३ लाख ६० हजार रुपये ग्रामपंचायतीला खर्च करावे लागत होते.

आता किती अनुदान मिळणार?

  • एक हजारपेक्षा कमी लोकसंख्या १२ लाख रुपये
  • १ ते २ हजार लोकसंख्या १८ लाख रुपये २० लाख रुपये
  • २ हजारपेक्षा अधिक लोकसंख्या १८ लाख रुपये २५ लाख रुपये

स्वनिधीची अट रद्दयाआधीच्या योजनेत ग्रामपंचायतींना १५ आणि २० टक्के स्वनिधीची अट घालण्यात आली होती. त्यामुळे ज्या ग्रामपंचायतीकडे इमारतच नाही त्यांना स्वनिधीसाठीही धडपड करावी लागत होती. आता ही अट रद्द करण्यात आली आहे.

 

  • महाराष्ट्रात ग्रामपंचायती २७,९०६
  • इमारत नसलेल्या ग्रामपंचायती ४,२५२
  • या योजनेतून प्रशासकीय मान्यता दिलेल्या ग्रामपंचायती १७४८
  • कोल्हापूर जिल्ह्यातील विनाइमारत ग्रामपंचायती १२९

 

या योजनेतून अनुदान रक्कम वाढवण्याचा आणि स्वनिधीची अट रद्द करण्याचा चांगला निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या योजनेतून निधी वाढवण्याची आवश्यकता आहे. - दत्ताभाऊ काकडे, अध्यक्ष, सरपंच परिषद, महाराष्ट्र राज्य 

शासनाच्या जुन्या योजनेनुसार ग्रामपंचायत बांधणीसाठी प्रस्ताव सादर केले आहेत. आता नव्या योजनेनुसार इमारत नसलेल्या ग्रामपंचायतींकडून प्रस्ताव मागवून घेण्यात येणार आहेत. - अरुण जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरgram panchayatग्राम पंचायत