कणंगला भागात जमीन संपादनासाठी शेतकऱ्यांना नोटिसा
By Admin | Updated: January 16, 2015 00:14 IST2015-01-15T23:59:05+5:302015-01-16T00:14:20+5:30
कर्नाटक शासनाची कार्यवाही : बाजू मांडण्यासाठी ३० दिवसांची मुदत

कणंगला भागात जमीन संपादनासाठी शेतकऱ्यांना नोटिसा
संकेश्वर : कणंगला (ता. हुक्केरी) परिसरातील औद्योगिक वसाहतीच्या संदर्भात शेतकऱ्यांना शासकीय औद्योगिक विभाग (धारवाड)कडून नोटिसा देण्यास प्रारंभ झाला आहे.कणंगला येथे केंद्र सरकार पुरस्कृत १९८५ मध्ये हिंदुस्थान लेटेक्स कारखाना सुरू झाला होता. त्यानंतर इंडियन गॅस प्लँट सुरू झाला. येथे औद्योगिक वसाहत स्थापण्यासाठी महसूल खात्यातर्फे गेल्या गुरुवारी (दि. ८) जमीन संपादनासाठी शेतकऱ्यांना नोटिसा दिल्याची चर्चा आहे.कर्नाटक कैगारिका प्रदेश अभिवृद्धी मंडळ धारवाड, १९६६ कर्नाटक औद्योगिक कायदा कलम २८ (१) अन्वये या नोटिसा तलाठ्यांमार्फत कणंगला पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना देण्यास सुरुवात केली असून, नोटिसीत शेतमालकाचे नाव, चकबंदी, हिस्सा असे वर्णन आहे. नोटीस स्वीकारल्यापासून ३० दिवसांत बाजू मांडण्याचा आदेश दिला आहे. (प्रतिनिधी)