कारखान्यांकडून शेतकऱ्यांना नोटिसा

By Admin | Updated: November 9, 2016 23:23 IST2016-11-09T23:03:41+5:302016-11-09T23:23:48+5:30

नाराजीचा सूर : करारभंगमुळे कारवाईचा ससेमिरा

Notices from the factories to the farmers | कारखान्यांकडून शेतकऱ्यांना नोटिसा

कारखान्यांकडून शेतकऱ्यांना नोटिसा

दत्तात्रय पाटील -- म्हाकवे -जिल्ह्यात गेल्या दशकात उसाचे क्षेत्र वाढल्यामुळे साखर कारखान्यांचीही संख्या वाढली आहे. त्यामुळे काही शेतकरी लावण केलेल्या ऊस क्षेत्राची नोंद दोन ते तीन कारखान्यांकडे करतात. परिणामी एकाच कारखान्याला हा ऊस मिळणार असून, अन्य कारखान्यांचा गाळप अंदाज चुकतो. त्यामुळे आता काही कारखान्यांनी गतवर्षी ऊस क्षेत्र नोंद केलेल्या, परंतु ऊस न पाठविलेल्या शेतकऱ्यांना नोटिसा पाठवून दंडात्मक कारवाईचा ससेमिरा त्यांच्या मागे लावला आहे. याबाबत शेतकऱ्यांतून नाराजीचे सूर उमटत आहेत.
जिल्ह्यात सुमारे दीड लाख हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड आहे. किंबहुना उसावरच येथील शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे, परंतु गतवर्षी दुष्काळजन्य परिस्थितीमुळे पाण्याअभावी येथील हजारो एकरांतील ऊसपीक वाळून गेले. याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. त्यामुळे येथील शेतकरी कासावीस झाला होता. पाण्याअभावी थोडे-फार नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनीही भविष्यातील नुकसान टाळण्यासाठी करार केलेल्याच कारखान्याच्या ऊसतोडणीची वाट न पाहता मिळेल त्या कारखान्याकडे ऊस पाठविला होता.
परंतु, काही कारखानदारांनी ऊस नोंदीचा करार भंग केल्यामुळे कारखान्याचे नुकसान झाले आहे. करार भंग करून आपण आमचेकडे नोंद केलेल्या उसाची अन्यत्र विल्हेवाट लावली आहे असे सांगत या नुकसानीची रक्कम आपणाकडून का वसूल करू नये? अशा नोटिसा संबंधित शेतकऱ्यांना पाठविण्यात आल्या आहेत.
दरम्यान, करारभंग करून उसाची अन्यत्र विल्हेवाट लावणाऱ्या शेतकऱ्यांकडून एकरी ७५० रुपये वसुली नुकसानभरपाई स्वरूपात कारखानदार करणार आहेत. तसेच संबंधित शेतकऱ्याने नोटीस पोहोचल्यापासून दहा दिवसांच्या आता याबाबत लेखी खुलासा करण्याचीही संधी दिली आहे. मात्र दहा दिवसांत कोणताही खुलासा न केल्यास अथवा केलेला खुलासा प्रशासनाला असमाधानकारक वाटल्यास नुकसान भरपाईची कारवाई करणार असल्याचेही या नोटिसीत नमूद केले आहे.


त्या नुकसानीला जबाबदार कोण?
काही कारखान्यांचे प्रशासन ऊसतोडणी कार्यक्रमात अदलाबदल करून
आपल्या बगलबच्च्यांचा ऊस मुदतीपूर्वीच उचल करतात, तर काही कारखानदार को-२६५ उसाची लावण करू नका, त्याला रिकव्हरी बसत नाही असे सांगतात. मात्र, अनेक कारखान्यांच्या प्रशासनातील संचालक, कारभाऱ्यांचाच को-२६५ ऊस क्रमपाळी डावलून तोडला जातो. यावेळी प्रामाणिकपणे जिवापाड कष्ट करून उसाची जपणूक करणाऱ्या शेतकऱ्यांच्या जातिवंत (६७१, ६६००३२) ऊसही शेतात खितपत पडतो. यावेळी कुठला कारखानदार संबंधित शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यायला येतो? अशा संतापजनक प्रतिक्रियाही शेतकऱ्यांतून उमटू लागल्या आहेत. त्या नुकसानीला जबाबदार कोण?
काही कारखान्यांचे प्रशासन ऊसतोडणी कार्यक्रमात अदलाबदल करून
आपल्या बगलबच्च्यांचा ऊस मुदतीपूर्वीच उचल करतात, तर काही कारखानदार को-२६५ उसाची लावण करू नका, त्याला रिकव्हरी बसत नाही असे सांगतात. मात्र, अनेक कारखान्यांच्या प्रशासनातील संचालक, कारभाऱ्यांचाच को-२६५ ऊस क्रमपाळी डावलून तोडला जातो. यावेळी प्रामाणिकपणे जिवापाड कष्ट करून उसाची जपणूक करणाऱ्या शेतकऱ्यांच्या जातिवंत (६७१, ६६००३२) ऊसही शेतात खितपत पडतो. यावेळी कुठला कारखानदार संबंधित शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यायला येतो? अशा संतापजनक प्रतिक्रियाही शेतकऱ्यांतून उमटू लागल्या आहेत.

गतवर्षी जानेवारी-फेब्रुवारीनंतर कागल तालुक्यातील कालव्यात पाणी येण्याची शक्यता दुर्मीळच होती. तसेच आमची शेतीही पठाराकडील भागातील माळरानावरील आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात १० ते १५ दिवसाला पाणी लागते. पाण्याअभावी १०० टक्के नुकसान होण्याची भीती असल्यानेच आम्ही उसाची तोड मिळेल त्या कारखान्याकडे ऊस पाठविला.
- विजय महादेव डाकवे, शेतकरी.

Web Title: Notices from the factories to the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.