शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात गायरान अतिक्रमणधारकांना नोटिसा, डोक्यावरील छप्पर जाण्याच्या भीतीने अस्वस्थता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 18:23 IST

अनेक ग्रामपंचायतींनी कॅव्हेट दाखल केले आहे, मात्र डोक्यावरील कारवाईची तलवार कधी हटणार याकडे नजरा लागल्या आहेत.

कोल्हापूर : गेली ३०-४० वर्षे डोक्यावर असणारे छप्पर काढून घेण्याच्या नोटिसा गायरान अतिक्रमणधारकांना लागू केल्याने ग्रामीण भागात कमालीची अस्वस्थता वाढली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने प्रक्रिया सुरू केली असली तरी त्याला स्थगिती मिळविण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. ‘निवासी’ अतिक्रमणे नियमित करून इतर काढून घेण्याबाबत शासन स्तरावर गांभीर्याने विचार सुरू आहे.जिल्हा प्रशासनाच्या वतीने शुक्रवारपासून अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे. अतिक्रमणधारकांनी स्वत:हून बांधकामे काढून घेण्याचे आदेश दिले आहेत. गावोगावी नोटिसा धडकल्याने ग्रामस्थांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे. गेली ३०-४० वर्षे राहणारे घर पाडले जाणार या भीतीने अतिक्रमणधारकांसमोर स्वत:चे मरण दिसू लागले आहे. अनेक ग्रामपंचायतींनी कॅव्हेट दाखल केले आहे, मात्र डोक्यावरील कारवाईची तलवार कधी हटणार याकडे नजरा लागल्या आहेत.शासन पातळीवर याचा अभ्यास सुरू असून, न्यायालयात पुन:विचार याचिका दाखल करत असताना केंद्र सरकारच्या पातळीवर कायद्यात कोणत्या प्रकारे दुरुस्ती करता येईल, याचा अभ्यास सुरू आहे. निवासी अतिक्रमणे कायम करत असताना त्यांच्याकडून तेथील रेडिरेकनरनुसार पैसे भरून घ्यावे व इतर कारणासाठी केलेली अतिक्रमणे काढून ती जागा शासनाने ताब्यात घेण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

न्यायालयाच्या भीतीने कारवाईची प्रक्रियान्यायालयाने अतिक्रमणे काढून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाला टाईमटेबल घालून दिले आहे. त्यानुसार कार्यवाही केली नाही तर न्यायालयाचा अपमान होतो, या भीतीने प्रशासनाने कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे.

मुलाबाळांना घेऊन जायचे कोठे?आयुष्याची पुंजी खर्च बांधलेले घर पाडल्यानंतर मुलाबाळांना घेऊन जायचे कोठे? असा प्रश्न अनेक कुटुंबांना पडला आहे.

खरंच घर पाडली जाणार का?निवारा नाही म्हणून गायरानावर घरे बांधून तिथेच स्थायिक झालेल्यांमध्ये रोजीरोटीवरील कुटुंबाची संख्या अधिक आहे. प्रशासनाने सुरू केलेल्या कारवाईने त्यांना रात्रभर झोपा लागत नाहीत. सकाळी कामावर जाण्याअगोदर ते एकमेकांना विचारतात ‘खरंच घरं पाडली जाणार का?’ पाडली तर जायचे कोठे? असे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर उभे आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर