शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur- ए. एस. ट्रेडर्स प्रकरण; निरीक्षक स्वाती गायकवाड यांना तपासात त्रुटींबद्दल नोटीस

By उद्धव गोडसे | Updated: February 14, 2024 13:11 IST

तीन वर्षांसाठी वेतनवाढ का रोखू नये?, खुलासा करण्याचा आदेश

कोल्हापूर : ए. एस. ट्रेडर्स कंपनीने केलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्याचा तपास करताना तत्कालीन तपास अधिकारी पोलिस निरीक्षक स्वाती गायकवाड यांच्याकडून त्रुटी राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी गायकवाड यांना नोटीस पाठवली असून, तीन वर्षांसाठी वेतनवाढ का रोखू नये? अशी विचारणा केली आहे. याबाबत योग्य खुलासा करण्याचा आदेश त्यांनी दिला आहे.ए. एस. ट्रेडर्स कंपनीवरील गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपवला होता. तपास अधिकारी औदुंबर पाटील, स्वाती गायकवाड यांनी तपास केला. निरीक्षक गायकवाड यांनी तपासात त्रुटी ठेवून संशयित आरोपींना मदत केल्याचा आरोप ए. एस. ट्रेडर्स विरोधी कृती समितीने केला होता. याची गंभीर दखल घेऊन अधीक्षक महेंद्र पंडित यांनी निरीक्षक गायकवाड यांची चौकशी लावली होती. आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या उपअधीक्षक सुवर्णा पत्की यांनी निरीक्षक गायकवाड यांच्या तपासाची चौकशी करून अहवाल अधीक्षक पंडित यांच्याकडे सोपवला. पंडित यांनी तो अहवाल विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडे सादर केला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आयजी फुलारी यांनी निरीक्षक स्वाती गायकवाड यांना नोटीस बजावली आहे. तपासात त्रुटी ठेवल्याचा ठपका ठेवून, तीन वेतनवाढ रद्द का करू नयेत, अशी विचारणा त्यांनी केली आहे.

गायकवाड यांच्याकडूनच मुख्य सूत्रधाराला अटकतत्कालीन तपास अधिकारी स्वाती गायकवाड यांनीच गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार लोहितसिंग सुभेदार याला अटक केली होती. यासह अन्य काही महत्त्वाच्या संशयितांना अटक करून त्यांच्या मालमत्ता जप्त करण्याचे काम त्यांनी केले होते. सूत्रधार लोहितसिंग याच्या अटकेनंतर त्याच्याकडून अपेक्षित मुद्देमाल जप्त झाला नाही. तसेच एका संशयितासोबत हॉटेलमध्ये बैठक घेतल्याचाही ठपका त्यांच्यावर होता.

अन्य अधिकाऱ्यांचेही काम संशयास्पदशाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच तत्कालीन पोलिस निरीक्षक राजेश गवळी आणि तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक श्रीकांत इंगवले यांनी तपासात गती घेतली नाही. आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे तपास वर्ग झाल्यानंतर तत्कालीन तपास अधिकारी निरीक्षक औदुंबर पाटील यांच्याही कार्यशैलीबद्दल फिर्यादींच्या तक्रारी आहेत. त्यामुळे यापूर्वीच्या सर्वच अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी, अशी अपेक्षा गुंतवणूकदारांकडून व्यक्त होत आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस