कागल पंचतारांकितमधील कंपन्यांना नोटीस

By Admin | Updated: May 25, 2015 00:37 IST2015-05-24T22:22:15+5:302015-05-25T00:37:41+5:30

विनापरवाना फलक : कारवाई का करू नये, अशी नगरपालिकेची विचारणा

Notice to companies in Kaagal Panchayat | कागल पंचतारांकितमधील कंपन्यांना नोटीस

कागल पंचतारांकितमधील कंपन्यांना नोटीस

कागल : नगरपरिषद हद्दीमध्ये विनापरवाना डिजीटल फलक उभे केल्याबद्दल कागल नगरपालिकेने कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील सात कंपन्यांकडे कारवाई का करू नये, याबद्दलचा लेखी खुलासा मागितला आहे. कागल बसस्थानक आवारातही भव्य फलक उभारल्याबद्दल एस. टी. महामंडळासही अशी नोटीस बजावली आहे.
नगरपालिका हद्दीत शहरामध्ये असे डिजीटल फलक लावून सार्वजनिक वाहतुकीस अडथळा येऊ नये, सार्वजनिक मालमत्तेबरोबरच खासगी मालमत्तेचे विद्रुपीकरण होऊ नये, जनतेला नाहक त्रास होऊ नये, या उद्देशाने शासनाने आता अशा डिजीटल फलकांबद्दल कडक धोरण स्वीकारले आहे, तर याबद्दल उच्च न्यायालयाकडे दर चार महि
न्यांना सर्वच नगरपालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांना आणि कर निरीक्षकांना अहवाल सादर करून प्रतिज्ञापत्रही द्यावे लागते.
या अनुषंगाने कागल नगरपरिषदेने येथील लक्ष्मी टेकडीजवळ नगरपालिका हद्दीत विनापरवाना फलक उभे केलेल्या किर्लोस्कर आॅईल्स, मेट्रो हायटेक, इंडोकाऊंट, विराज सिटी, एफ. एम. टेक्सटाईल, रेमण्ड, मेनन, सोकटॉस या कंपन्यांना या नोटिसा पाठविल्या आहेत, तर बसस्थानक आवारात एस. टी. महामंडळाने विविध कंपन्यांच्या जाहिरातीसाठी परवानगी दिली आहे. मात्र, कागल शहराच्या हद्दीत येणाऱ्या कोणत्याही जाहिरातीवर नगरपालिका कर बसतो म्हणून विनापरवाना हे फलक लावल्याबद्दल एस. टी. महामंडळालाही नगरपालिकेने कारवाईची नोटीस बजावली आहे.
डिजीटल फलकाबद्दलच्या या नव्या धोरणात डिजीटल फलकावरच नगरपालिकेने दिलेला परवाना क्रमांक छपाई करणे बंधनकारक आहे. शहरातही जर असे फलक उभे केले असतील, तर त्याची माहिती देण्यासाठी १८००२३३१२२३ हा टोल फ्री क्रमांक देण्यात आला आहे. यावर देखरेख ठेवण्यासाठी प्रभागनिहाय समिती तयार करण्यात येणार आहे. त्यामुळ या फलकांची माहितीही लगेच मिळणार आहे. (प्रतिनिधी)

फौजदारी दाखल करण्याची तरतूद
विनापरवाना जाहिरात कर चुकवून असे फलक लावणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी नगरपालिका संबंधितांवर थेट फौजदारी गुन्हेही दाखल करू शकते. कागल नगरपालिकेने सात कंपन्यांवर ही कारवाई सुरू केली आहे; पण शहरात उभारण्यात येणाऱ्या विविध फलकांच्या बाबतीत हेच धोरण स्वीकारणार काय? हा खरा प्रश्न आहे.

Web Title: Notice to companies in Kaagal Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.