शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

Strike: नोटीसचा धसका, तेरा हजार अंगणवाडी कर्मचारी कामावर

By समीर देशपांडे | Updated: January 9, 2024 13:58 IST

समीर देशपांडे कोल्हापूर : अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपाला महिना उलटून गेल्याने कर्मचारी अस्वस्थ असून यातूनच सुमारे १३ हजार कर्मचारी सोमवारी ...

समीर देशपांडेकोल्हापूर : अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपाला महिना उलटून गेल्याने कर्मचारी अस्वस्थ असून यातूनच सुमारे १३ हजार कर्मचारी सोमवारी दुपारपर्यंत कामावर हजर झाले होते. विविध बैठका आणि मोर्चा, आंदोलनातूनही शासनाने ताठर भूमिका घेतली असून कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्यापासून परावृत्त करताना संघटना नेत्यांचीही कसोटी लागली आहे.आशा कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ झाल्यानंतर लगेचच अंगणवाडी कर्मचाऱ्यांनीही आपले आंदोलन पुकारले. ‘मानधन नको, वेतन द्या’ या मागणीसह विविध मागण्यांसाठी ४ डिसेंबर २३ पासून अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगवाडी सेविकांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. याला आता महिना उलटून गेला आहे. यामुळे राज्यातील सुमारे ७४ हजार अंगणवाड्यांचे कामकाज ठप्प झाले होते. यानंतर मुंबईत आयोजित बैठकीतील चर्चा फिसकटली. त्यानंतर नागपूर अधिवेशनावर मोर्चाही काढण्यात आला. तेथेही कोणताच निर्णय न झाल्याने ३ डिसेंबरला मुंबईतील आझाद मैदानातूनही मोर्चा काढण्यात आला.

महिला व बालविकास आयुक्त रूबल अगरवाल यांनी सर्व जिल्ह्यांना पत्रे पाठवून अंगणवाडीच्या बालकांना द्यावयाच्या पोषण आहाराबाबत पर्यायी यंत्रणा उभारण्याच्या सूचना दिल्या. याच दरम्यान जे अंगणवाडी कर्मचारी दोन, तीन महिन्यांपूर्वी सेवेत रुजू झाले आहेत. अशांना जिल्हा कार्यक्रम अधिकाऱ्यांकडून नोटिसा काढण्यात आल्या आहेत.आपण नव्यानेच नियुक्त झाला असून संपात सहभागी न होता आपण कामावर हजर व्हावे अन्यथा आपली सेवा समाप्त करून प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी दिली जाईल, असे पत्र काढल्याने अनेक जिल्ह्यांतील कर्मचारी हवालदिल झाले आहेत. यातूनच मग अनेक ठिकाणी कर्मचारी कामावर हजर होऊ लागले आहेत. राज्यभरातील सोमवारी कामावर हजर झालेल्या कर्मचाऱ्यांचा आकडा १२ हजार ८७५ इतका होता.

  • राज्यातील एकूण अंगणवाड्या ७३ हजार ९४१
  • कामावर हजर झालेल्या सेविका ४ हजार ३९
  • एकूण अंगणवाडी मदतनीस संख्या ७५ हजार ८७१
  • कामावर हजर झालेल्या मदतनीसांची संख्या ८ हजार ८५
  • एकूण मिनी अंगणवाडी सेविका संख्या १२ हजार ४५०
  • हजर झालेल्या सेविका ७५१
  • एकूण हजर झालेले कर्मचारी १२ हजार ८७५
टॅग्स :kolhapurकोल्हापूरStrikeसंप