शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
2
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
3
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
4
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
छांगूर बाबाच्या बेनामी मालमत्तेवर ED ची कारवाई; पुण्यात आढळली २०० कोटी रुपयांची जमीन
6
उद्धव ठाकरेंपाठोपाठ शरद पवारांनाही धक्का! भाजपामध्ये 'इनकमिंग' सुरूच; अनेकांचा पक्षप्रवेश
7
ऑलिम्पिक क्रिकेटसाठी केवळ ६ संघांना संधी, कशी ठरणार पात्रता, कोण घेणार निर्णय? नीट समजून घ्या
8
शाळा सोडली, स्वप्न थांबली, पण हार नाही मानली; आव्हानांना तोंड देत पार पाडतेय कर्तव्य
9
धक्कादायक! 'पंचायत' फेम आसिफ खानला हृदयविकाराचा झटका, म्हणाला- "एका क्षणात सगळं बदललं..."
10
एक कोटी रुपये कमाई, तरीही तो दु:खी, सोशल मीडियावर मांडली व्यथा, म्हणाला, पैसा आहे पण...   
11
५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत! आयुष्मान कार्ड अंतर्गत नेमके कोणते आजार येतात? लगेच तपासा!
12
शुभांशू शुक्ला परतले, पंतप्रधान मोदींनी स्वागत केले; गगनयान मोहिमेचा उल्लेख करत म्हणाले...
13
Astro Tips: सगळं काही चांगलं आहे, तरी लग्न होत नाही; याला कारणीभूत ठरू शकते ग्रहदशा!
14
Olympics 2028: ऑलिंम्पिकचं वेळापत्रक जाहीर! कधी, कुठं रंगणार क्रिकेट सामने? A टू Z माहिती
15
फक्त २० रुपयांमध्ये २ लाखांचा विमा! मोदी सरकारची 'ही' योजना संकटात बनेल आधार! कसा करायचा अर्ज?
16
"मराठी माणसानेच मराठी भाषेचं नुकसान केलं...", आपल्याच भाषेबद्दल हे काय बोलून गेला आस्ताद काळे? भडकले चाहते
17
"खाण्यासाठीच कमावतोय..."; मॅनेजरने लंच ब्रेक घेण्यापासून रोखलं, कर्मचाऱ्याने सडेतोड उत्तर दिलं
18
४ दिवसांच्या घसरणीनंतर बाजाराची जोरदार मुसंडी! हिरो मोटो ते सन फार्मा... 'या' शेअर्सने केलं मालामाल
19
Pune Porsche Accident Update: दोघांना उडवणाऱ्या आरोपीला दिलासा, पोलिसांना मोठा झटका; न्याय मंडळाचा निर्णय काय?
20
बेडरुमचा दरवाजा वाजवला, आईला संशय आला; दार तोडताच रक्ताच्या थारोळ्यात दिसले पती-पत्नी

गैरहजर राहणाऱ्या अडत्यांना नोटिसा

By admin | Updated: September 23, 2014 00:46 IST

सदस्यांची बैठकीत सूचना : अशासकीय सदस्य कमालीचे संतप्त

कोल्हापूर : सूचना देऊनही बैठकीला दांडी मारणारे अडते व व्यापाऱ्यांना नोटिसा बजावण्याची सूचना कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या अशासकीय सदस्यांनी आज दिली. गूळ नियमन रद्द व शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत बैठक आयोजित केली होती, पण याकडे अडते व व्यापाऱ्यांनी पाठ फिरविल्याने सदस्य आक्रमक झाले आहेत. नियमन रद्द झाल्याने गुळाचे सौदे कसे काढायचे याबाबत पेच निर्माण झाला आहे. त्यावर गेले महिनाभर चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. मध्यंतरी बाजार समितीने शेतकरी, अडते व व्यापाऱ्यांच्यामध्ये सामंजस्य करार झाल्याची घोषणा केली होती पण आज पुन्हा याबाबत शेतकरी प्रतिनिधी, अडते व व्यापाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. त्यामध्ये शेतकऱ्यांनी पुन्हा जुन्याच मुद्द्यांची उजळणी केली. अडत कमी करावी, खराब रव्यांचा लागलाच सौदा व्हावा, सात दिवसांत गुळाची पट्टी मिळावी, ‘जी.आय.’ मार्कची अंमलबजावणी करावी, संपूर्ण गुळाचे वजनमाप करावे, एक किलो गूळ रव्यांच्या बॉक्ससह वजन करावे, अशा मागण्या गूळ उत्पादक शेतकऱ्यांनी बैठकीत केल्या. अडत कमी करण्यास अडत्यांचा विरोध असल्याचे प्रशासनाने सांगितले. अडत्यांना बाजूला करून विकास संस्थांमार्फत सौदे काढण्याबाबत चर्चा झाली. पण ते संस्थांना शक्य नाही. संस्थांकडे गूळ साठवण्याची व्यवस्था नाही, त्याचबरोबर आगाऊ उचलीचा प्रश्नही असल्याचे सदस्य मधुकर जांभळे यांनी सांगितले. जुन्या पद्धतीनेच गुळाचे सौदे पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय या बैठकीत झाला. बैठक असल्याचे कळवूनही न आलेले अडते, व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याची सूचना मधुकर जांभळे व बाजीराव पाटील (वडणगेकर) यांनी केली. यावेळी अशासकीय मंडळाचे अध्यक्ष आर. के. पोवार, सदस्य बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, सत्यजित जाधव, सुभाष पाटील, वैभव सावर्डेकर, सचिव संपतराव पाटील, उपसचिव विजय नायकल, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, बाळासाहेब पाटील, पंचायत समितीचे सदस्य तानाजी आंग्रे, शिवाजी पाटील, उत्तम पाटील आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी, दि. २८ दुपारी एक वाजता होत आहे. अशासकीय मंडळाचे अध्यक्ष आर. के. पोवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सभेत बाजार समितीचे गेल्या वर्षभरात घडलेल्या घडामोडींचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. बाजार समितीची सर्वसाधारण सभेला कार्यक्षेत्रातील विकास संस्थांचे प्रतिनिधी, ग्रामपंचायतींचे सदस्य, खरेदी-विक्री संस्थांचे प्रतिनिधी, व्यापारी, अडते, हमाल, तोलाईदार उपस्थित असतात. गेले वर्षभरात बाजार समितीमध्ये कमालीच्या घडामोडी झाल्या आहेत. संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक आले. प्रशासकांना हटवून अशासकीय मंडळ कार्यरत आहे. त्याचे पडसाद सर्वसाधारण सभेत उमटण्याची शक्यता अधिक आहे. संचालक मंडळाने केलेला कारभार, नोकरभरती त्यावर झालेला खर्च, बाजार समितीतील असुविधा याचा पाढा वाचण्यासाठी काहींनी तयारी केली आहे. गूळ हंगाम तोंडावर आहे, गेले हंगामात सातत्याने सौदे बंद पडले होते, त्यामुळे विकास संस्थांचे प्रतिनिधीही आक्रमक होण्याची शक्यता आहे. बाजार समितीतील रस्ते, गटर्स, कचरा आदी समस्यांबाबत व्यापारी व अडत दुकानदार हैराण आहेत. या प्रश्नांवरही जोरदार विचारणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.