जयसिंगपुरातील ३५ धार्मिक स्थळांना नोटिसा
By Admin | Updated: November 25, 2015 00:44 IST2015-11-24T23:35:29+5:302015-11-25T00:44:46+5:30
न्यायालयाच्या आदेशाने कार्यवाही : हरकती सादर करण्यासाठी एक महिन्याची मुदत

जयसिंगपुरातील ३५ धार्मिक स्थळांना नोटिसा
जयसिंगपूर : जयसिंगपूर नगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक व शासकीय जागेवरील ३५ अनधिकृत धार्मिक स्थळांना नोटीस बजावण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे़ शहरातील झोपडपट्टी भागात सर्वाधिक मंदिरे असल्याने शहरवासीयांना आता मंदिरेही गमावण्याची भीती निर्माण झाली आहे़ या सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कार्यवाही करण्यात येणार आहे़
शहरामध्ये प्रमुख मार्गांवर अनेक छोटी-मोठी मंदिरे उभारली असून, यामध्ये अतिक्रमणाचीही भर
पडली आहे़ त्यामुळे अनधिकृत धार्मिक स्थळे यांची बांधकामे काढून टाकण्यासाठी कारवाई केली जाणार आहे़
यामध्ये महाराष्ट्र शासनाकडून सार्वजनिक व शासकीय जागेवरील अनधिकृत धार्मिक स्थळांवर बडगा येण्याअगोदर या मंदिरांना एक महिन्याची परवाना हरकत मुदत देण्यात आली आहे़
ही अनधिकृत धार्मिक स्थळे कायम करण्यासाठी एक महिन्यात परवानगी घेणे आवश्यक आहे, तर बांधकामे काढून टाकण्याच्या वर्गवारीतील धार्मिक स्थळांबाबत हरकती घेण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे़
येत्या महिन्यात संबंधित धार्मिक स्थळांकडून कोणतीही कार्यवाही न झाल्यास बांधकाम काढून टाकणार असल्याचा सर्वाेच्च न्यायालयाचा आदेश आहे़ (प्रतिनिधी)
धार्मिक स्थळे
शहरातील गणपती मंदिर, शाहूनगर गार्डन, १००८ आदिनाथ जैन मंदिर-शाहूनगर, बाळूमामा मंदिर, मदिना मस्जिद, संतोषीमाता मंदिर, रेणुका मंदिर-गल्ली नं़ ६, हनुमान मंदिर, यडूबाई मंदिर, काशिलिंग मंदिर, नवनाथ मंदिर, दुर्गामाता मंदिर, कालिमाता मंदिर, ककरीमाता मंदिर, लक्ष्मीमाता मंदिर, रेणुका मंदिर-गल्ली नं़ ९, रेणुका मंदिर-गल्ली नं़ ७, मसोबा मंदिर, इराणी मस्जिद, लक्ष्मी मंदिर ही सर्व मंदिरे राजीवनगरमधील आहेत़ दुर्गा मंदिर, हनुमान मंदिर, दर्गा-नांदणी रोड, मसोबा मंदिर-स्टेडियम आवार, रेणुका मंदिर-गल्ली नं़ ६, साईबाबा मंदिर-शाहूनगर, धोंडिराम बापू समाधी-नांदणी रोड, हनुमान मंदिर-गल्ली नं़ ३, मसोबा मंदिर-डेबॉन्स कॉर्नर, हनुमान मंदिर-झोपडपट्टी, जैन मंदिर-गल्ली नं़ ६, ज्ञानानंद मंदिर-इंदिरानगर झोपडपट्टी, महादेव मंदिर-वैरण बाजार, विठ्ठल मंदिर-नांदणी नाका, अशा जयसिंगपूर शहरातील ३५ मंदिरांना शासनाकडून नोटिसा आल्या आहेत़