(वाचू नये। सुधारित दिली आहे) आशांना दिलेले कार्यमुक्तीचे पत्र रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:21 IST2020-12-08T04:21:16+5:302020-12-08T04:21:16+5:30

कोल्हापूर : आशा वर्कसनी क्षयरोग आणि कुष्ठरूग्ण सर्वेक्षणामध्ये सहभाग घेतला नाही तर त्यांना कार्यमुक्त करण्याचा इशारा देणारे ...

(Not read. Revised) Dismissal letter given to Asha canceled | (वाचू नये। सुधारित दिली आहे) आशांना दिलेले कार्यमुक्तीचे पत्र रद्द

(वाचू नये। सुधारित दिली आहे) आशांना दिलेले कार्यमुक्तीचे पत्र रद्द

कोल्हापूर : आशा वर्कसनी क्षयरोग आणि कुष्ठरूग्ण सर्वेक्षणामध्ये सहभाग घेतला नाही तर त्यांना कार्यमुक्त करण्याचा इशारा देणारे पत्र सोमवारी जिल्हा परिषदेने रद्द केले. कोल्हापूर जिल्हा आशा वर्कस व गटप्रवर्तक युनियन यांच्यावतीने हे पत्र रद्द करण्याबरोबरच अन्य मागण्यांसाठी सोमवारी दुपारी जिल्हा परिषदेसमोर दोन तास रास्ता रोको केला व घोषणा देत परिसर दणाणून सोडला. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना बोलवून घेवून प्रश्र्न सोडविण्याची तराटणी दिली.

राज्यामध्ये क्षयरोग, कुष्ठरोग सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. मात्र आधीचेच मानधन मिळालेले नसल्याने या सर्वेक्षणावर आशा वर्कस आणि गटप्रवर्तक यांनी बहिष्कार घातला होता. जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्याची घोषणाही केली होती. त्यानुसार दुपारी १२ पासूनच जिल्ह्यातून आशा वर्क, गटप्रवर्तक मोठ्या संख्येने जमू लागल्या. पाउूण तासातच मोठी गर्दी झाली. सर्वांनीच जिल्हा परिषदेसमोरील रस्त्यावर ठिय्या मारला. जोरदार घोषणाबाजी केली.

दरम्यान ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा परिषदेच्या आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना शासकीय विश्रामगृहावर बोलावून घेतले. तेथे चर्चा झाल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी मोर्चासमोर येवून झालेल्या निर्णयांची माहिती दिली. यावेळी उपाध्यक्ष सतीश पाटील म्हणाले, मंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतर कार्यमुक्तीचे पत्र रद्द करण्यात आले आहे. माझे कुटुंब, माझी जबाबदारीचे मानधन या आठवड्यात दिले जाईल. मानधनाची वाढीव मागणी आणि अन्य मागण्यांबाबत आरोग्य सचिव यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यामुळे याही मागण्या मार्गी लागणार आहेत. शासनाकडून केवळ ३ कोटी रूपये आले असताना साडे आठ कोटी रूपये आतापर्यंत वितरित करण्यात आले आहेत.

महिला आणि बालकल्याण समिती सभापती डॉ. पद्माराणी पाटील म्हणाल्या, कोरोना काळात तुम्ही बजावलेल्या सेवेचे आम्ही साक्षीदार आहोत. तुमच्या मागण्या मान्य करण्यासाठी आम्ही तुमच्या पाठीशी राहू. यावेळी चंद्रकांत यादव, शिवाजी मगदूम, सारिका पाटील, उज्वला पाटील, संगीता पाटील यांची भाषणे झाली.

चौकट

तुमचे दर्शन घेण्याचे भाग्य मिळाले

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील यांचे यावेळचे भाषण लक्षवेधी झाले. ते म्हणाले, सगळ्याच मागण्या एकाच दिवशी पूर्ण होणार नाहीत. पण शक्य आहे तेवढे सर्व आम्ही करणार आहोत. तुम्ही आमच्या आई, बहिणीसारख्या आहात. तुमचे दर्शन घेण्याचे भाग्य आम्हांला मिळाले.

०७१२२०२० कोल झेडपी ०१

कोल्हापुरात सोमवारी विविध मागण्यांसाठी आशा वर्कस आणि गटप्रवर्तकांनी जिल्हा परिषदेसमोर रास्ता रोको आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी केली. (छाया नसीर अत्तार)

Web Title: (Not read. Revised) Dismissal letter given to Asha canceled