शहरं
Join us  
Trending Stories
1
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
2
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
3
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
4
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
5
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
6
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
7
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
8
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
9
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
10
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
11
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
12
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
13
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
14
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
15
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
16
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
17
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
18
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
20
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर

मतदार नसलेल्यांनी उद्या ६ नंतर जिल्ह्यात थांबू नये; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 12:50 AM

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीचा जाहीर प्रचार रविवारी (दि. २१) सायंकाळी सहानंतर बंद होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मतदार नसलेल्या बाहेरील ...

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीचा जाहीर प्रचार रविवारी (दि. २१) सायंकाळी सहानंतर बंद होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मतदार नसलेल्या बाहेरील व्यक्तींसह राजकीय पक्षांशी निगडित किंवा प्रचारकार्यात कार्यरत असणाºया बाहेरील व्यक्तींंना सायंकाळी सहानंतर कोल्हापूर जिल्ह्यात थांबता येणार नाही. त्यांनी मुदतीपूर्वीच जिल्ह्याबाहेर जावे, असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शुक्रवारी दिले.लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघांत मंगळवारी (दि. २३) सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे. लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ चे कलम १२६ अन्वये मतदान समाप्त होण्यासाठी निश्चित केलेली वेळ समाप्त होण्याच्या कालावधीपूर्वी ४८ तासांच्या कालावधीत प्रचार बंद करण्याची तरतूद केली आहे.या तरतुदीनुसार जिल्ह्याबाहेरील व्यक्ती किंवा जिल्ह्यातील मतदार नाहीत अशा व्यक्ती तसेच राजकीय पक्षांशी निगडित किंवा प्रचारकार्यात कार्यरत होत्या अशा व्यक्तींना उद्या, रविवारी सायंकाळी सहा वाजल्यानंतर जिल्ह्यात थांबता येणार नाही. निवडणुकीतील प्रचारादरम्यान राजकीय पक्ष प्रचारकार्यास मदत करण्यासाठी मतदारसंघाबाहेरील समर्थकांना संघटित केले जाते. प्रचार कालावधी संपल्यांनतर, मतदारसंघात कोणताही प्रचार करता येणार नसल्याने मतदारसंघाच्या बाहेरून आणण्यात आलेले राजकीय पदाधिकारी, पक्ष कार्यकर्ते, मिरवणुकीतील व प्रचार मोहिमेतील कार्यकर्त्यांना मतदारसंघात उपस्थित राहू देऊ नये. कारण त्यांच्या उपस्थितीमुळे मुक्त व निष्पक्ष वातावरण धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा निवडणूक प्रशासन, पोलीस प्रशासनाने प्रचारमोहिमेचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर तत्काळ संबंधितांनी मतदारसंघ सोडला आह का, याची खातरजमा करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.राजकीय पक्षांनी खबरदारी घ्यावीया आदेशाचे सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी पालन करून मुदतीनंतर जिल्ह्णाबाहेरील व्यक्ती प्रचारकार्यात सामील असणार नाहीत व त्या जिल्हा व मतदारसंघाबाहेर जातील याची खबरदारी घ्यावी, अशी सक्त सूचना जिल्हाधिकारी देसाई यांनी केली आहे.