मनपा पोटनिवडणूक;पाच उमेदवार रिंगणात
By Admin | Updated: June 11, 2014 01:15 IST2014-06-11T01:13:50+5:302014-06-11T01:15:39+5:30
निवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू

मनपा पोटनिवडणूक;पाच उमेदवार रिंगणात
कोल्हापूर : महानगरपालिका प्रभाग क्रमांक ६२, संभाजीनगर या प्रभागात होत असलेल्या पोट निवडणुकीसाठी आज, मंगळवारी राष्ट्रवादी-जनसुराज्य पक्ष आघाडीतर्फे श्रीमती शशिकला यशवंत बराले यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. या प्रभागात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आज शेवटच्या दिवसापर्यंत पाच उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान, ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत.
आतापर्यत माधुरी किरण नकाते, स्वाती अजित सासने, स्मिता विजय देसाई व संस्कृ ती तुषार देसाई यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आज राष्ट्रवादी-जनसुराज्य पक्षातर्फे शशिकला यशवंत बराले यांनी अर्ज भरला. यावेळी महापौर सुनीता राऊत, ‘राष्ट्रवादी’चे गटनेते राजू लाटकर, ‘जुनसुराज्य’चे विजयसिंह पाटील, परिवहन सभापती वसंत कोगेकर, शिक्षण समिती सभापती संजय मोहिते, नगसेवक मुरलीधर जाधव, प्रा. जंयत पाटील यांच्यासह अनेक नगरसेवक उपस्थित होते
या प्रभागात कॉँग्रेसने आपला उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट झाले. गृहराज्यमंत्री सतेज पाटील व खासदार धनंजय महाडिक कोल्हापुरात आल्यानंतर या हालचाली गतिमान होतील, असे सांगण्यात आले.