मनपाचे ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार जाहीर

By Admin | Updated: September 5, 2015 00:13 IST2015-09-05T00:13:03+5:302015-09-05T00:13:03+5:30

बावड्यात आज वितरण : खासगी शाळांसह १३ जणांची निवड; दोन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा होणार गौरव

Nomination announces 'Adarsh ​​Teacher' award | मनपाचे ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार जाहीर

मनपाचे ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार जाहीर

कोल्हापूर : शालेय शिक्षणात महत्त्वाचा पाया असणाऱ्या प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सातत्याने वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या कोल्हापूर महापालिकेच्या शाळांतील आठ, तर खासगी प्राथमिक शाळांतील पाच शिक्षकांना आज, शनिवारी शिक्षक दिनानिमित्त ‘आदर्श शिक्षक’ म्हणून गौरविण्यात येणार आहे. याचबरोबर शिक्षकांच्या खांद्याला खांदा लावून तितक्याच मेहनतीने झाडलोटसह शिक्षणाचे काम करणाऱ्या दोन सेवकांनाही यंदापासून गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे सभापती महेश जाधव यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
पुरस्कार वितरण आज शुक्रवारी डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज सभागृह, लाईन बाजार, कसबा बावडा येथे वितरित केले जाणार आहेत. या कार्यक्रमासाठी आमदार हसन मुश्रीफ, माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, माजी आमदार मालोजीराजे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी उपसभापती भरत रसाळे, समीर घोरपडे, अशोक पोवार, प्रभारी प्रशासन अधिकारी प्रतिभा सुर्वे, आदी उपस्थित होते.
पुरस्कार विजेते पुढीलप्रमाणे मनपा शाळा : विजया वसंतराव चव्हाण (प्राथमिक शिक्षण मंडळ, पर्यवेक्षिका), सुनील श्रीकांत गणबावले (मुख्याध्यापक, आण्णासाो शिंदे विद्यांमदिर, लक्षतीर्थ), महेश म्हाकू ठोंबरे (सहायक शिक्षक, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यामंदिर, कदमवाडी), कृष्णात बाबासाो पाटील (सहायक शिक्षक, लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिर, जरगनगर), दीपक नामदेव कुंभार (सहायक शिक्षक, राजोपाध्येनगर, विद्यामंदिर ).
खासगी शाळा : वसुधा कृष्णात चव्हाण (सहायक शिक्षिका, गागी देसाई टोपीवाले विद्याभवन, भवानी मंडप), सूर्यकांत मुरलीधर माने (सहा. शिक्षक, त्र्यंबोली विद्यामंदिर, टेंबलाईवाडी), शरिफा राजेसाब पेंढारी (सहायक शिक्षिका, सावित्री श्रीधर विद्यामंदिर, सदर बझार), परशराम शंकर घाटगे (सहा. शिक्षक, डॉ. श्रीधर सावंत विद्यामंदिर, रुईकर कॉलनी), इंदुबाई वसंत माळी (सहाय्यक शिक्षिका, वाय. पी. पोवार विद्यामंदिर, मुक्त सैनिक वसाहत) यांच्यासह तानाजी पाटील (सहायक शिक्षक, संत रोहिदास विद्यामंदिर, सुभाषनगर), प्रियांका साजणे (सहायक शिक्षिका, शेलाजी वनाजी विद्यालय, लक्ष्मीपुरी), अशोक कांबळे
(सहायक शिक्षक, माझी शाळा, भोसलेवाडी) यांना विशेष पुरस्कार
कर्मचारी : राजश्री सूर्यवंशी (सेविका, राजर्षी छत्रपती संभाजी विद्यालय, मोरे कॉलनी), नागेश आचार्य (सेवक, शिक्षण मंडळ, कोल्हापूर) यांचा शिक्षकेतर कर्मचारी म्हणून गौरव करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

घोळ पुरस्कारांचा अन् हॉलचाही
प्राथमिक शिक्षण मंडळाच्यावतीने जाहीर होणाऱ्या पुरस्कारांचा घोळ शुक्रवारी सायंकाळपर्यंत सुरू होता. पुरस्कारप्राप्त शिक्षकांच्या यादीमध्ये कधी सभापती, तर कधी उपसभापती हे वारंवार जाऊन त्यात बदल करीत होते. त्यामुळे ही यादी सायंकाळपर्यंत तयार होत नव्हती. याचबरोबर महापालिकेच्या या शिक्षण विभागाला हा पुरस्कार सोहळा वितरण करण्यासाठी हॉल मिळत नव्हता. अखेर डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजचा हॉल या सोहळ्यासाठी निवडण्यात आला.

विद्यार्थ्यांना मोफत पास
महापालिका शाळांमधील विद्यार्थी संख्या वाढावी, म्हणून सभापती महेश जाधव यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना रोख शिष्यवृत्ती व ३५० विद्यार्थ्यांना के.एम.टी. बस सेवेचे पास मोफत देण्याचे जाहीर केले होते. त्याप्रमाणे महापालिकेच्या ५९ शाळांमधून ७२ विद्यार्थ्यांना रोख शिष्यवृत्ती व ३५० विद्यार्थ्यांना मोफत बस पास बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे.

Web Title: Nomination announces 'Adarsh ​​Teacher' award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.