शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
3
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
4
"...तर पाकिस्तान हल्ला करेल!"; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची भारताला पोकळ धमकी
5
गर्लफ्रेंडसोबत चायनीज खाताना आईने लेकाला रंगेहाथ पकडलं; रस्त्यात चपलेने मारलं, धू-धू धुतलं
6
'या' कंपनीनं लाँच केला १८० दिवसांचा प्लान; SonyLIV सारख्या OTT चं मिळणार सबस्क्रिप्शन, काय आहे खास?
7
Leopard in Marathi: परीकडे बघून राधा अन् समृद्धी हसली; तिघींची गट्टी जमली
8
क्रिकेटवेडी, बोल्ड फोटो अन् शुबमनसोबत रिलेशनशीपची चर्चा; अवनीत कौर नेमकी आहे तरी कोण?
9
IPL 2025: वैभव सूर्यवंशीकडे आहेत 'इतक्या' बॅट; आकडा ऐकून नितीश राणा झाला शॉक, पाहा व्हिडीओ
10
"दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्यांना सोडणार नाही"; पहलगाम हल्ल्यावरुन PM मोदींची मोठी घोषणा
11
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
12
नाशिकमध्ये आणखी एक हत्या! आरोपीने हत्या केल्यानंतर स्वतःच नेले जिल्हा रुग्णालयात, स्वतःहून गेला पोलीस ठाण्यात
13
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
14
हिंदी चित्रपटात का दिसत नाहीत भरत जाधव? सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले- "एकदा मला नोकराची भूमिका..."
15
भारताच्या भीतीनं कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये भूकंप, असा पडला की आता बाहेर येणंही झालं कठीण
16
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
17
"दोन पेग मारल्यानंतर सलमान खानने माझ्याशी..."; मिका सिंगने सांगितली भाईजानची कधीही न ऐकलेली गोष्ट
18
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
19
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
20
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय

यंदाच्या दिवाळीत ध्वनिप्रदूषण घटले; रहिवासी क्षेत्रात फटाक्यांचा आवाज कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 11:07 IST

या वर्षीच्या दिवाळीत कोल्हापूर शहरांच्या विविध भागांमध्ये फटाक्यांचा आवाज कमी राहिल्याने ध्वनिप्रदूषण घटले आहे. दिवाळीच्या कालावधीत लक्ष्मीपूजनादिवशी सायंकाळी ६.३० ते रात्री ९.३० या वेळेत सर्वाधिक आवाजाची नोंद झाली. रहिवासी क्षेत्रात आवाजाची पातळी कमी झाली आहे, अशी माहिती शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. पी. डी. राऊत यांनी दिली.

ठळक मुद्दे यंदाच्या दिवाळीत ध्वनिप्रदूषण घटले; रहिवासी क्षेत्रात फटाक्यांचा आवाज कमीशिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाची पाहणी

कोल्हापूर : या वर्षीच्या दिवाळीत कोल्हापूर शहरांच्या विविध भागांमध्ये फटाक्यांचा आवाज कमी राहिल्याने ध्वनिप्रदूषण घटले आहे. दिवाळीच्या कालावधीत लक्ष्मीपूजनादिवशी सायंकाळी ६.३० ते रात्री ९.३० या वेळेत सर्वाधिक आवाजाची नोंद झाली. रहिवासी क्षेत्रात आवाजाची पातळी कमी झाली आहे, अशी माहिती शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. पी. डी. राऊत यांनी दिली.विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाने यावर्षी औद्योगिक, व्यावसायिक, रहिवासी आणि शांतता क्षेत्रनिहाय शहरातील २२ ठिकाणी रविवारी (दि. २७) ते मंगळवार (दि. २९) दरम्यान पाहणी केली. सायंकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत ध्वनिप्रदूषणाच्या नोंदी घेतल्या. त्यामध्ये गेल्या वर्षीपेक्षा यंदाच्या दिवाळीत गुजरी कॉर्नर, पापाची तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, मिरजकर तिकटी, बिंदू चौक, शिवाजी उद्यमनगर आणि वाय. पी. पोवारनगर परिसर वगळता अन्य ठिकाणी फटाक्यांचा आवाज कमी राहिला.

शांतता क्षेत्रातील आवाजाने मर्यादा ओलांडली. जास्तीत जास्त आवाज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाल्याचे निदर्शनास आले. कोल्हापूरकरांमध्ये प्रदूषणाबाबत झालेली जागृती यामुळे फटाक्यांचा आवाज कमी झाला आहे. हे शहराच्या पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणारे आहे.

पर्यावरणशास्त्र अधिविभागातील साहाय्यक प्राध्यापक डॉ. ए. एस. जाधव, डॉ. संदीप मांगलेकर, संशोधक विद्यार्थी चेतन भोसले, एम. एस्सी. अभ्यासक्रमाचे विद्यार्थी नीलेश शिंगाडे, सूरज पोवार, विनायक तुरंबे, शीतल पाटील यांनी ध्वनिपातळी मोजण्याचे काम केले असल्याचे डॉ. राऊत यांनी सांगितले.गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा फटाक्यांचा आवाज (डेसिबलमध्ये)शहरातील ठिकाणे                       २०१८                २०१९

शांतता क्षेत्र 

  1. सीपीआर                                   ६०.९०             ५२.७६
  2. न्यायालय                                 ६२.६०             ५०.६३
  3. जिल्हाधिकारी कार्यालय            ६१.१०             ५५.३५
  4. शिवाजी विद्यापीठ                   ५४.३०             ५०.५४रहिवासी  क्षेत्र   
  5. राजारामपुरी                              ५४.५०             ५३.३१
  6. उत्तरेश्वर पेठ                            ६२.८०             ६१.६५
  7. ताराबाई पार्क                            ५६.९०              ५४.७८
  8. शिवाजी पेठ                               ५८.९०             ५५.५६
  9. नागाळा पार्क                              ५५.९०            ५२.९६व्यावसायिक क्षेत्र   
  10. राजारामपुरी                               ६४.४०            ५८.५२
  11. मंगळवार पेठ                             ५४.७०             ५३.८५
  12. शाहूपुरी                                      ६२.३०             ५९.०३
  13. लक्ष्मीपुरी                                  ६१.९०              ५८.३१
  14. महाद्वार रोड                            ६३.७०              ६०.३३
  15. गुजरी कॉर्नर                              ६३.४०             ६६.२७
  16. पापाची तिकटी                          ६२.४०             ६५.८४
  17. बिनखांबी गणेश मंदिर              ६०.३०             ६३.२१
  18. मिरजकर तिकटी                       ५७.८०            ५८.३८
  19. गंगावेश                                     ६२.७०            ६०.४०
  20. बिंदू चौक                                   ६१.५०            ६१.६७औद्योगिक  क्षेत्र   
  21. शिवाजी उद्यमनगर                 ५८.५०             ५९.६१
  22. वाय. पी. पोवारनगर                  ५६.७०             ५८.१९ 

मर्यादा अशाक्षेत्र                           रात्री

  • औद्योगिक           ७०
  • व्यावसायिक         ५५
  • रहिवासी                ४५
  • शांतता                  ४०

 

 

 

टॅग्स :pollutionप्रदूषणkolhapurकोल्हापूर