शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
5
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
6
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
7
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
8
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
9
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
10
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
11
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
12
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
13
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
14
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
15
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
16
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
17
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
18
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
19
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
20
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

पाणी नसल्याने ‘स्वाभिमानी’ने मध्य प्रदेशमध्ये रेल्वे रोखली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 23:45 IST

संतोष बामणे। लोकमत न्यूज नेटवर्क रतलाम (मध्य प्रदेश) : संसदेला घेराव घालण्यासाठी महाराष्ट्रातून नवी दिल्लीकडे चाललेल्या शेतकऱ्यांच्या ‘स्वाभिमानी’ एक्स्प्रेसमध्ये ...

संतोष बामणे।लोकमत न्यूज नेटवर्करतलाम (मध्य प्रदेश) : संसदेला घेराव घालण्यासाठी महाराष्ट्रातून नवी दिल्लीकडे चाललेल्या शेतकऱ्यांच्या ‘स्वाभिमानी’ एक्स्प्रेसमध्ये बुधवारी रात्रीपासून पाणी, स्वच्छता व सुरक्षा नसल्याने मोठ्या प्रमाणात गैरसोय निर्माण झाली. गुरुवारी सकाळी शौचालयासाठीही पाणी नसल्याने संतापलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मध्य प्रदेशमधील रतलाम जंक्शन येथे रेल्वे रोखून आंदोलन केले. यावेळी त्यांनी प्रशासनाला घेराव घालून जाब विचारला.महाराष्ट्रातून बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास स्वाभिमानीची विशेष रेल्वे मिरज येथून दिल्लीच्या दिशेने रवाना झाली. त्यांनतर पाच तास विलंब झाल्याने या रेल्वेत पुणे येथे पाणी भरले नाही. त्यानंतर कल्याण व सुरत येथे रात्री कर्मचारी नसल्याने पाणी भरले नाही. त्यामुळे पहाटेपासूनच रेल्वेत असलेल्या सुमारे दीड हजारांहून अधिक शेतकºयांना पाण्यामुळे मोठी गैरसोय सोसावी लागली. सुरत रेल्वेस्थानकातही फक्त दोनच बोगीत पाणी भरल्याने अन्य१५ बोगीत अडचण कायम राहिली.अशा परिस्थितीत शेतकºयांना शौलाचालयाला जाण्यासाठीही सकाळी साडेनऊपर्यंत पाणी उपलब्ध न झाल्याने अखेर संतापलेल्या कार्यकर्त्यांनी रतलाम जंक्शनवर रेल्वे रोखून आंदोलन केले. यावेळी स्वाभिमानीचे नेते सावकार मादनाईक, राजेंद्र गड्याण्णावर व भगवान काटे यांनी प्रशासनाला जाब विचारला.आंदोलन पाचवीलाच : राजू शेट्टीस्वाभिमानी विशेष रेल्वे प्रासंगिक करार करून दिल्लीच्या आंदोलनाला रेल्वे नेत आहोत. त्यामुळे सुविधा देणे बंधनकारक आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे शेतकºयांना त्रास सहन करावा लागला. आंदोलन केल्यानंतरच पाणी मिळाले असल्याने आमच्या पाचवीला आंदोलन पुजलेले असल्याचे खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.