शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

जानेवारीपर्यंत हिरण्यकेशीवर उपसाबंदी नाही,गडहिंग्लज येथील बैठकीत निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 15:06 IST

River, MLA, Water, kolhapurNews चित्री लाभक्षेत्रातील संपूर्ण शेतीला पाणी मिळण्यासाठी रखडलेले पाणी प्रकल्प पूर्ण होणे आवश्यकआहे. ते मार्गी लावून आजरा व गडहिंग्लज तालुक्यांचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, अशी ग्वाही आमदार राजेश पाटील यांनी दिली.

ठळक मुद्देजानेवारीपर्यंत हिरण्यकेशीवर उपसाबंदी नाही,गडहिंग्लज येथील बैठकीत निर्णयपाणीप्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी प्रयत्नशील :राजेश पाटील

गडहिंग्लज : चित्री लाभक्षेत्रातील संपूर्ण शेतीला पाणी मिळण्यासाठी रखडलेले पाणी प्रकल्प पूर्ण होणे आवश्यकआहे. ते मार्गी लावून आजरा व गडहिंग्लज तालुक्यांचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, अशी ग्वाही आमदार राजेश पाटील यांनी दिली.हिरण्यकेशी नदीवरील उपसाबंदीसंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. येथील पाटबंधारे कार्यालयात ही बैठक झाली.चित्रीमध्ये उपलब्ध पाणी साठा विचारात घेता जानेवारीपर्यंत उपसाबंदीची गरज नाही.जानेवारीत पुन्हा बैठक घेऊन उपसाबंदीचे नियोजन करावे, अशी सूचनाही त्यांनी केली.पाटील म्हणाले, आंबेओहोळ, सर्फनाला व किटवडे हे प्रकल्प मार्गी लागल्यानंतरच आजरा व गडहिंग्लज तालुक्यातील पाणीप्रश्न कायमचा निकाली निघणार आहे.तसेच आजर्‍यातील कोल्हापूर पध्दतीच्या दोन बंधार्‍यांसाठीदेखील आपण प्रयत्नशील आहोत. गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षीही उपसाबंदीचे योग्य नियोजन करावे.संकेश्वर कारखान्याचे मळीमिश्रित नदीत मिसळू नये,यासाठी कारखान्याला सूचना द्यावी,असेही आमदार पाटील यांनी सांगितले. आजऱ्याचे सभापती उदय पोवार म्हणाले, हिरण्यकेशी नदी पात्राचे खोलीकरण करावे.आजरा तालुक्यातील लाभक्षेत्रात उपसाबंदी नको. माजी सभापती अमर चव्हाण म्हणाले, खणदाळ बंधाऱ्यापर्यंत उपसाबंदी करू नये.नांगनूरचे उपसरपंच विकास मोकाशी म्हणाले, कर्नाटक हद्दीतील नव्या गोटूर बंधार्‍याची चौकशी करावी.कार्यकारी अभियंता स्मिता माने यांनी चित्रीच्या पाण्याच्या यावर्षीच्या नियोजनाबाबतची रुपरेषा सांगितली.बैठकीस सभापती रुपाली कांबळे, उपसभापती श्रीया कोणकेरी,अभय देसाई, विजयराव पाटील, विद्याधर गुरबे, बनश्री चौगुले, इंदूमती नाईक, उपअभियंता तुषार पोवार उपस्थित होते.संबंधितांवर कारवाई कराउपसाबंदी कालावधीत बंधार्‍याच्या फळ्या बेकायदा काढून पाणी सोडणाऱ्यांवर कडक कारवाई करा, अशी सूचनाही आमदार पाटील यांनी यावेळी केली.

 

टॅग्स :riverनदीkolhapurकोल्हापूरMLAआमदार