शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दुकाने, व्यवसाय बंद करण्यासाठी दबावतंत्र नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 18:16 IST

BJP collector kolhapur - राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाच्या वतीने रात्री ८ वाजताच दुकाने व व्यवसाय बंद करण्यासाठी मोठ्या प्रमाणात दबाव तंत्र वापरले जात आहे. अशा पध्दतीने दबाव टाकणे योग्य नाही. तसेच संभाव्य जे लॉकडाऊन होणार आहे त्यालाही आमचा विरोध असल्याचे निवेदन बुधवारी भाजपच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिले.

ठळक मुद्देदुकाने, व्यवसाय बंद करण्यासाठी दबावतंत्र नको भाजपचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

कोल्हापूर : राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाच्या वतीने रात्री ८ वाजताच दुकाने व व्यवसाय बंद करण्यासाठी मोठ्या प्रमाणात दबाव तंत्र वापरले जात आहे. अशा पध्दतीने दबाव टाकणे योग्य नाही. तसेच संभाव्य जे लॉकडाऊन होणार आहे त्यालाही आमचा विरोध असल्याचे निवेदन बुधवारी भाजपच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिले. व्यवसायाची वेळ वाढवून देण्याबाबत आपण प्रयत्न करू अशी ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचा दावा भाजपच्यावतीने करण्यात आला आहे.पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव आणि भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने देसाई यांची भेट घेतली आणि चर्चा केली. दुपारी प्रचंड ऊन असताना सर्व सामान्य नागरिक स्वत:च्या घरासाठी लागणारी खरेदी करण्यासाठी संध्याकाळीच बाहेर पडतात परंतु रात्री ८ वाजताच दुकाने व व्यवसाय बंद करण्यासाठी प्रशासनाकडून फार मोठ्या प्रमाणात दबाव तंत्र वापरले जात आहे. यातून समाजातील सर्वच घटकात असंतोष वाढत चालला आहे. याची दखल घेण्याची विनंती यावेळी करण्यात आली.याप्रसंगी सरचिटणीस दिलीप मेत्राणी, गणेश देसाई, मारुती भागोजी, चंद्रकांत घाटगे, सचिन तोडकर, प्रदीप उलपे, दिग्विजय कालेकर, विक्रम राठोड, कालिदास बोरकर, नजीर देसाई, अशोक लोहार, गायत्री राऊत, अप्पा लाड यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.भाजपच्यावतीने महेश जाधव आणि राहूल चिकोडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बुधवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना लॉकडाऊनच्या विरोधामध्ये निवेदन दिले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBJPभाजपाcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर