कोरोना विरुद्धच्या लढाईत राजकारण नको : नवीद मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:17 IST2021-06-10T04:17:25+5:302021-06-10T04:17:25+5:30

येथील हसन मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशनच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरला तीन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर ...

No politics in the fight against Corona: Naveed Mushrif | कोरोना विरुद्धच्या लढाईत राजकारण नको : नवीद मुश्रीफ

कोरोना विरुद्धच्या लढाईत राजकारण नको : नवीद मुश्रीफ

येथील हसन मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशनच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरला तीन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन प्रदान करण्यात आली. सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेंद्र पाटील यांच्याकडे ती देण्यात आली. या वेळी नवीद मुश्रीफ बोलत होते. शाहू साखर कारखाना परीसरात हे कोविड सेंटर सुरू आहे. जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, उपनगराध्यक्ष बाबासाहेब नाईक, नगरसेवक सौरभ पाटील, विवेक लोटे, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष संजय चितारी, संजय फराकटे, बच्चन कांबळे, राहुल गाडेकर, निशांत जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

फोटोओळी

कागल येथील हसन मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशनच्या कोविड केअर सेंटरला तीन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन प्रदान करण्यात आली. या वेळी नवीद मुश्रीफ, भैय्या माने, प्रकाशराव गाडेकर व मान्यवर उपस्थित होते.

Web Title: No politics in the fight against Corona: Naveed Mushrif