शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी प्रश्नावर संसदेत बोलण्याची कोणाची हिंमत नाही, राजू शेट्टींनी व्यक्त केली खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 12:40 IST

देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी देशासमोर कृषी क्षेत्राशिवाय पर्याय नाही

कोल्हापूर : शेतकऱ्यांचे प्रश्न दिवसेंदिवस जटील होत असताना त्यांच्या प्रश्नांवर विधिमंडळ व संसदेत बोलण्याची कोणामध्ये हिंमत नाही, अशी खंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी व्यक्त केली.राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेच्यावतीने गजरौला (उत्तर प्रदेश) किसान-मजदूर स्वाभिमान महापंचायत मेळाव्यात ते बोलत होते. सरदार व्ही. एम. सिंग मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते. शेट्टी म्हणाले, कृषी क्षेत्रामध्ये स्थिर आयात-निर्यात धोरण, संशोधन केंद्रांचे आधुनिकीकरण, किमान हमीभाव कायदा, पायाभूत सुविधा या गोष्टींची कृषी क्षेत्रात अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत कृषी क्षेत्रामध्ये स्थिरता निर्माण होणार नाही. स्वातंत्र्यावेळी ३४ कोटी जनतेला पोटभर पुरेल एवढे धान्य उत्पादित होत नव्हते. आज जवळपास १५० कोटी जनतेला पुरेल एवढे धान्य उत्पादित करून अनेक उत्पादनांची निर्यात केली जात आहे.अनेक संकटांचा सामना करत काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत व कच्छपासून ते मेघालयपर्यंत असणाऱ्या वेगवेगळ्या प्रांतातील शेतकऱ्यांच्या खांद्यावर देशाची अर्थव्यवस्था टिकून आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेले टॅरिफ वॅार, युद्धजन्य परिस्थिती अशा काळात देशातील १५० कोटी जनतेला दोनवेळ पुरेल एवढे धान्य निर्माण करून देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी देशासमोर कृषी क्षेत्राशिवाय पर्याय नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी देशभरातील शेतकरी संघटनांचे नेते उपस्थित होते.