शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
3
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
4
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
5
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
6
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
7
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
8
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
9
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
10
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
11
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
12
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
13
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
14
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
15
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
16
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
17
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
18
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
19
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
20
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं

भरपूर प्रयोग केले आता, आपलेच शेत नांगरणार - राजू शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2023 18:16 IST

नव्या पर्यायाचा विचार तूर्तास नाही

राम मगदूमगडहिंग्लज : देशपातळीवर भाजप आणि राज्यपातळीवर 'महाविकास'सोबत आघाडीचा प्रयोग करून पाहिला. परंतु, दोघेही एकाच माळेचे मणी निघाले. जनतेच्या भल्यासाठी नवे प्रयोग करण्याच्या नादात आपलेच शेत नांगरायचे राहून गेले. त्यामुळे आधी आपले शेत  नांगरतो, चांगली मशागत करतो. तरच पीक चांगले येईल.त्यामुळे सद्य:स्थितीत राज्याला नवा पर्याय देण्याचा विचार तूर्तास डोक्यात नाही, अशी प्रतिक्रिया  माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली.स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या'छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी जनजागृती अभियानाच्या पार्श्वभूमीवर ते गडहिंग्लज विभागाच्या दौऱ्यावर आले होते.यावेळी राज्यातील राजकीय घडामोडीसंदर्भात छेडले असता त्यांनी हे स्पष्टीकरण दिले. चळवळीची पार्श्वभूमी असलेले शेकाप, कम्युनिस्ट आदी पक्ष आणि अन्य छोट्या- मोठ्या संघटनांनी एकत्र येणे ही आमची नैसर्गिक युती आहे.आमचे'कार्यक्षेत्र' व 'पॉकेट'ही वेगळे आहे,आम्ही वेळोवेळी एकमेकांना मदतही करीत असतो. परंतु,नव्या पर्यायाचा ठोस विचार अद्याप केलेला नाही,असेही त्यांनी सांगितले.शेट्टी म्हणाले, किमान समान कार्यक्रमाच्या अजेंड्यावर भाजप सोबत आघाडी केली होती. परंतु, त्यांच्यासोबत गेल्यानंतर अपयशी 'गुजरात मॉडेल'ची आभासी प्रतिमा समोर आली. 'किमान समान'ला बगल देण्याबरोबरच भूमीअधिग्रहण कायद्यात दुरुस्ती करून त्यांनी शेतकऱ्यांवर अन्याय केल्यामुळेच त्यांची संगत सोडली.पुन्हा त्यांची संगत करण्याचा विचार नाही.राज्यातील महाविकास आघाडीचीही आम्ही दोन वर्षे सोबत केली.त्यांनीही अनाधिकाराने  ऊसाच्या  'एफआरपी'चे तुकडे केले, भूमीअधिग्रहण व  भरपाईच्या कायद्यात बदल करून शेतकऱ्यांवर अन्याय केल्यामुळे त्यांच्याशीही दोन वर्षांपासून संबंध तोडले आहेत,असेही त्यांनी सांगितले.

म्हणूनच सगळ्यांपासून 'संन्यास'लग्नानंतर काहीकाळाने वैराग्य येते.तसे अनुभावाअंती आम्ही सगळ्याच आघाड्यांपासून संन्यास घेतला आहे, त्यामुळे नव्या लग्नाचा विचार सध्या नाही असेही शेट्टींनी स्पष्ट केले.

नेत्यांनी 'लायकी'तपासून पहावीसध्याच्या राजकीय घडामोडी पाहून लोक मतदान कार्ड जाळायला लागले आहेत. निवडणूक आयोगाने बोटाला 'शाई ऐवजी चुना' लावावा, असं म्हणायला लागले आहेत. सामान्य माणसांच्या अशा प्रतिक्रिया असतील तर सर्वच राजकीय नेत्यांनी अंतर्मुख होऊन आपली काय लायकी आहे, हे एकदा तपासून पहावे, असेही शेट्टी म्हणाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRaju Shettyराजू शेट्टी