शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

लॉकडाऊन नाही पण सतर्क रहा : सतेज पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 18:00 IST

corona virus Kolhapur-कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी सर्वच क्षेत्रातील प्रमुखांनी दक्षता घ्यावी, नो मास्क नो एन्ट्री या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करावी. लॉकडाऊन आता कोणत्याही घटकाला परवडणारे नाही त्यामुळे सतर्क रहा असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी केले.

ठळक मुद्देलॉकडाऊन नाही पण सतर्क रहा : सतेज पाटीलव्यावसायिक संघटनांच्या बैठकीत सुचना

कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी सर्वच क्षेत्रातील प्रमुखांनी दक्षता घ्यावी, नो मास्क नो एन्ट्री  या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करावी. लॉकडाऊन आता कोणत्याही घटकाला परवडणारे नाही त्यामुळे सतर्क रहा असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना व नियोजनाबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलंडे, जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके उपस्थित होते.मंत्री पाटील म्हणाले, सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याबाबत काटेकोर उपाययोजना करायला हव्यात. राज्याला कोल्हापूरने दिलेली नो मास्क नो एन्ट्री या मोहिमेची काटेकोर अंमलबजावणी व्हायला हवी. मागील अनुभव पाहता आपण सर्वांनी काळजी घेऊन आपली जबाबदारी पार पाडावी.जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, मागील वर्षी अतिशय शिस्तबध्द यंत्रणा राबविली होती. त्याचप्रमाणे प्रतिबंधात्मक तयारीवर भर द्यावा लागेल. मास्कचा वापर, सामाजिक अंतर आणि सॅनिटायझरचा वापर या त्रिसूत्रिवर भर द्यावा लागेल. सर्वजण यंत्रणा सज्ज ठेवू आणि कोल्हापूर जिल्ह्याला कोव्हिड पासून मुक्त ठेवू.पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी लॉकडाऊन, संचारबंदी नको असेल तर प्रत्येकांनी स्वत:ची आणि इतरांचीही काळजी घेतली पाहीजे. प्रशासनास मदत करावी, असे आवाहन केले.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी यावेळी संगणकीय सादरीकरण करुन सविस्तर माहिती दिली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांच्यासह रिक्षा संघटना, नाभिक संघटना, हॉटेल मालक संघटना, रेशन दुकान संघटना, सिनेमागृह संघटना, क्रिडाई, चेंबर ऑफ कॉमर्स, इंजिनिअरिंग असोसिएशन, कोल्हापूर मेडिकल असोसिएशन, पेट्रोल पंप असोसिएशन, एलपीजी असोसिएशन, रिलायन्स मॉल, स्टार बझार, मार्केट यार्ड आदींचे पदाधिकारी उपस्थित होते.मार्गदर्शक सुचना अशा

  • मास्क नाही तर प्रवेश नाही हा फलक लावून त्याची अंमलबजावणी हवी.
  •  प्रवासी क्षमतेनुसार, नियमानुसार वाहतूक हवी.
  • ५० टक्के क्षमतेनुसार हॉटेल चालवावेत,
  • स्वस्त धान्य दुकानांवर गर्दी टाळावी, पॉस मशिनसाठी सॅनिटायझर वापरा.
  •  लक्षणे दिसताच शासकीय रुग्णालयात कामगारांनी उपचारासाठी गेलं पाहीजे.
  • खासगी रुग्णालयांनी मागील बेडची संख्या तपासून तयारी ठेवावी, आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण व्हायला हवे.
  • मास्क शिवाय एसटीत प्रवासी नसावा याबाबत वाहकांना सूचना द्यावी.
  • शाळा, महाविद्यालयांमध्ये शिक्षकाबरोबर विद्यार्थ्यांनाही मास्क हवा.
  •  मंगल कार्यालय व्यवस्थापकांनी दक्ष राहून नियमांचे काटेकोर पालन करावे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारीSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलkolhapurकोल्हापूर