यंदाही विसर्जन मिरवणूक नाही, महाद्वार रोडवरून वाहतूक बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:30 AM2021-09-17T04:30:55+5:302021-09-17T04:30:55+5:30

रविवार दि. १९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या गणेश विसर्जनासाठी आता पोलीस प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे. या तयारीची माहिती देताना ...

No immersion procession again, traffic closed on Mahadwar Road | यंदाही विसर्जन मिरवणूक नाही, महाद्वार रोडवरून वाहतूक बंद

यंदाही विसर्जन मिरवणूक नाही, महाद्वार रोडवरून वाहतूक बंद

Next

रविवार दि. १९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या गणेश विसर्जनासाठी आता पोलीस प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे. या तयारीची माहिती देताना बलकवडे म्हणाले, गेल्यावर्षी कोरोनामुळे विसर्जन मिरवणुकीवर बंधने आली होती. यंदाही त्याच पद्धतीने बिनखांबी गणेश मंदिर ते पापाची तिकटी हा मार्ग बंद करण्यात येणार आहे. या ठिकाणी शनिवारीच मार्ग बंद करून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. केवळ मंडळाच्याच नव्हे तर सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी हा मार्ग बंद राहणार आहे. त्यामुळे गणेश मंडळांना गतवर्षीप्रमाणे यंदाही पर्यायी मार्गाने इराणी खणीकडे जावे लागणार आहे.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर शासनाने जे निर्देश दिले आहेत याबाबत नोटिसीच्या माध्यमातून सर्व गणेशोत्सव मंडळांना माहिती देण्यात येत आहे. त्याच पद्धतीने शांततेत, गर्दी न करता, मोजक्या कार्यकर्त्यांनी विसर्जन करावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. वाहतुकीच्या नियोजनासाठी शहरातील मुख्य मार्ग, चौकात वाहतूक पोलिसांचा आवश्यक तो बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. विसर्जन मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात येणार आहे. याचबरोबर नाकाबंदी करून गैरप्रकारावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. बिंदू चौक, मिरजकर तिकटी, पापाची तिकटी, उमा टॉकीज चौक अशा गर्दीच्या ठिकाणी मनोरे उभे करण्यात आले आहेत.

चौकट

सीसी टीव्हीचा वॉच

सेफ सिटी अंतर्गत शहरामध्ये जे सीसीटीव्ही बसवले आहेत. तसेच इराणी खण परिसरातही अशा कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. याची मदत विसर्जनाच्या दिवशी घेतली जाणार आहे.

कोट

शासनाच्या निर्देशानुसार सर्व यंत्रणांच्या माध्यमातून शहरामध्ये शांततेत विसर्जन करण्यासाठी सर्व मंडळे, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक यांनी सहकार्य करावे. कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर ही खबरदारी घेतली जात आहे. यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे.

शैलेश बलकवडे

जिल्हा पोलीस प्रमुख, कोल्हापूर

Web Title: No immersion procession again, traffic closed on Mahadwar Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.