शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

एकही फाइल आता राहणार नाही प्रलंबित - डॉ. शैलेंद्र देवळाणकर; उच्चशिक्षणमंत्री ॲक्शन मोडवर  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 16:30 IST

३१ जानेवारीपर्यंत झिरो पेंडन्सी उपक्रम

कोल्हापूर : उच्च व तंत्र शिक्षण विभागातील एकही फाइल प्रलंबित राहू नये यासाठी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेतला असून, येत्या ३१ जानेवारीपर्यंत उच्च शिक्षण विभागात झीरो पेंडन्सी उपक्रम राबवला जात असल्याची माहिती उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली. या विभागात आता एकही फाइल प्रलंबित राहणार नाही, असा दावाही त्यांनी केला.उच्च शिक्षण विभागाच्या वतीने झीरो पेंडन्सी उपक्रम राज्यभरातील दहाही विभागांत राबविला जाणार असून, याची सुरुवात कोल्हापुरातून करण्यात आली. यावेळी देवळाणकर यांनी विभागीय शिक्षण सहसंचालक कार्यालयातील प्रलंबित विषयांचा आढावा घेतला.उच्च शिक्षण विभागातील वेतन निश्चिती, सेवानिवृत्ती, भविष्य निर्वाह निधी, वैद्यकीय देयके व अनुकंपा प्रकरणांची एकही फाइल येत्या ३१ जानेवारीपर्यंत प्रलंबित राहणार नाही यादृष्टीने ही झीरो पेंडन्सी सुरू करण्यात आल्याचे देवळाणकर यांनी सांगितले. त्याअनुषंगाने सर्व विभागांतील शिक्षण सहसंचालक कार्यालयांना सूचना देण्यात आल्या आहेत.देवळाणकर म्हणाले, या उपक्रमांतर्गत शिक्षण संचालकांसह पाच जणांची समिती प्रत्येक विभागात जाऊन तेथील कार्यालयांचा आढावा घेणार आहे. याची सुरुवात कोल्हापुरातून झाली. ही समिती काही महाविद्यालयांना भेटी देण्याबरोबरच प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी यांच्याशीही संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेईल. सहसंचालक कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून कोणाची अडवणूक होत असेल तर त्याचीही माहिती ही समिती जाणून घेईल.उच्च शिक्षणमंत्री देणार अचानक भेटीझीरो पेंडन्सीबाबत उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील हे ॲक्शन मोडवर आले असून, ते १ फेब्रुवारीपासून अचानक शिक्षण सहसंचालक कार्यालयांना भेटी देणार असल्याचे डॉ. देवळाणकर यांनी सांगितले. झीरो पेंडन्सी उपक्रम केवळ जानेवारीपुरता मर्यादित नसून या विभागात आता एकही प्रकरण प्रलंबित राहणार नाही या दृष्टीने पावले टाकली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

तक्रार असेल तर थेट संचालकांशी संपर्क साधाउच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयात कोणाकडून अडवणूक होत असेल तर त्यांनी थेट शिक्षण संचालक, सहसंचालक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. देवळाणकर यांनी केले. दरम्यान, विद्यापीठासंदर्भात व सीएचबीधारकांचे एकही प्रकरण विभागीय शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडे प्रलंबित नसल्याचे सहसंचालक डॉ. धनराज नाकाडे यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरEducation Sectorशिक्षण क्षेत्रchandrakant patilचंद्रकांत पाटील