शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षण नाही तोपर्यंत कोल्हापुरात प्रवेश नाही, कागलातून राज्यकारभार करा; मराठा समाजाने मंत्री मुश्रीफांना ठणकावले

By संदीप आडनाईक | Updated: October 27, 2023 12:43 IST

कोल्हापूर : मराठा आरक्षणप्रश्नी संतप्त सकल मराठा समाजाने, आज शुक्रवारी सकाळी कोल्हापूर रेल्वे स्टेशनवर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना रोखून धरले. जोपर्यंत मराठा ...

कोल्हापूर : मराठा आरक्षणप्रश्नी संतप्त सकल मराठा समाजाने, आज शुक्रवारी सकाळी कोल्हापूर रेल्वे स्टेशनवर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना रोखून धरले. जोपर्यंत मराठा आरक्षण नाही तोपर्यंत तुम्हाला कोल्हापूर शहरात प्रवेश नाही असे ठणकावून सांगत कागलातून राज्यकारभार करा असे आंदोलकांनी ठणकावले. यावेळी कार्यकर्त्यांनी केलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून सोडला.प्रचंड पोलिस बंदोबस्त असतानाही सकल मराठा समाजाच्या कार्यकत्यांनी, विशेषत: महिला आंदोलकांनी पालकमंत्र्यांची गाडी अडविली. त्यामुळे पालकमंत्र्यांना गाडीतून उतरून आंदोलकांना सामोरे जावे लागले. यावेळी मराठा आरक्षणासंदर्भात २०१४ पासून राज्य सरकारने मराठा समाजाला कसे फसविले आणि १५ ऑगस्ट २०२३ पासून पुन्हा नव्याने कसे फसवत आहे, याचा पाढाच आंदोलकांनी वाचला.पालकमंत्र्यांनी "जरा धीर धरा... मराठ्यांना आरक्षण आम्ही देणारच.." असे सांगण्याचा प्रयत्न केला असता आंदोलक आक्रमक झाले. नुसत्या घोषणा नको, पक्की तारीख सांगा, आता शासनकर्ते आणि राज्यकर्त्याकडून समाजाला फसवू शकत नाही असे ठणकावून सांगितले. कोर्टाच्या पायरीवर टिकणारे आरक्षण मराठयांना जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत पालकमंत्र्यांना कोल्हापूर शहर बंद असून त्यांनी कागलात बसून राज्यकारभार करावा असे सुनावले. आंदोलकांनी आक्रमक होऊन पुन्हा घोषणाबाजी सुरू केली म्हणून तेथे बंदोबस्ता असलेल्या पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, तेंव्हा पालकमंत्री मुश्रीफ गाडीत बसून निघून गेले. आंदोलनकर्त्यानी घोषणा सुरूच ठेवल्या, त्यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना सोडून दिले.

या आंदोलनामध्ये ॲड. बाबा इंदुलकर, बाबा पार्टे, विजय देवणे, चंद्रकांत पाटील, अमित अतिग्रे, अविनाश दिंडे, अमर निंबाळकर, निलेश लाड, श्रीकांत पाटील, महादेव पाटील, भिकाजी मंडलिक, सुनिता पाटील, सुधा सरनाईक, सुवर्णा मिठारी, छाया जाधव, पुजा पाटील, भारती दिवसे, मयूर पाटील यांनी भाग घेतला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaratha Reservationमराठा आरक्षणHasan Mushrifहसन मुश्रीफ