अंत्ययात्रा नव्हे, संघर्षयात्रा
By Admin | Updated: February 22, 2015 01:05 IST2015-02-22T00:58:54+5:302015-02-22T01:05:02+5:30
आज ‘महाराष्ट्र बंद’ची हाक

अंत्ययात्रा नव्हे, संघर्षयात्रा
दुपारी सव्वातीन वाजता अंत्ययात्रेला सुरुवात झाली. हातात लाल ध्वज घेतलेले असंख्य कार्यकर्ते व जनसमुदाय त्यात सहभागी झाला होता. ‘लाल सलाम, लाल सलाम; गोविंद पानसरे, लाल सलाम’ या घोषणा अखंडपणे दिल्या जात होत्या. पक्षाच्या नेत्यांनी ही अंत्ययात्रा नव्हे तर एक संघर्षयात्रा असेल, असे जाहीर केले होते. त्यानुसार ही संघर्षयात्रा दसरा चौक, आईसाहेब महाराज पुतळा, बिंदू चौक, शिवाजी पुतळा, महानगरपालिका, चिमासाहेब चौक, बुधवार पेठेमार्गे पंचगंगा मुक्तिधामवर पोहोचली. अंत्ययात्रेच्या मार्गावर अनेक व्यक्ती, संस्था यांच्यावतीने पार्थिवावर पुष्पहार अर्पण करून पानसरे यांना श्रद्धांजली वाहिली. सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास पानसरे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
आज ‘महाराष्ट्र बंद’ची हाक
अॅड. गोविंद पानसरे यांच्यावर गोळीबार करणारे चार दिवसांनंतरही पकडण्यात आलेले अपयश आणि भ्याड हल्ल्याचा निषेध नोंदविण्यासाठी आज, रविवारी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक देण्यात आली आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कार्यकारिणीचे सदस्य प्रकाश रेड्डी यांनी दसरा चौकात शनिवारी ही हाक दिली.