खेडे सरपंचावरील अविश्वास ठराव ग्रामसभेत मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:31 IST2021-09-10T04:31:48+5:302021-09-10T04:31:48+5:30
खेडे (ता. आजरा ) येथील लोकनियुक्त सरपंच रूपाली महेश आरदाळकर यांच्यावरील अविश्वास ठराव गुरुवारी झालेल्या ग्रामसभेत बहुमताने मंजूर करण्यात ...

खेडे सरपंचावरील अविश्वास ठराव ग्रामसभेत मंजूर
खेडे (ता. आजरा ) येथील लोकनियुक्त सरपंच रूपाली महेश आरदाळकर यांच्यावरील अविश्वास ठराव गुरुवारी झालेल्या ग्रामसभेत बहुमताने मंजूर करण्यात आला. ठरावाच्या बाजूने ५७५, तर ठरावाच्या विरोधी २०५ मते मिळाली. पीठासन अधिकारी म्हणून गटविकास अधिकारी बी. डी. वाघ हे होते.
सरपंच रूपाली आरदाळकर यांच्याविरुद्ध उपसरपंच संगीता शिंदे यांच्यासह ९ सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. तो यापूर्वी मासिक सभेत मंजूर करण्यात आला होता. रूपाली आरदाळकर या लोकनियुक्त सरपंच असल्यामुळे ग्रामसभा घेऊन त्यामध्ये गुरुवारी मतदान घेण्यात आले. ग्रामसभेत ८०३ नागरिकांनी मतदानाचा हक्क बजाविला. त्यामध्ये २३ मते अवैध ठरली. अविश्वास ठरावाच्या बाजूने ५७५, तर विरोधी २०५ मते मिळाली.