राज्यातील कोणत्याही कलाकाराला उपाशी मरू देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:28 IST2021-08-28T04:28:19+5:302021-08-28T04:28:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क गारगोटी : गेले दीड वर्ष कोरोनाकाळात मनोरंजनाचे जाहीर कार्यक्रम बंद झाल्याने कलाकारांचे जगणे मुश्किल झाल्याने कलाकार ...

No artist in the state will starve | राज्यातील कोणत्याही कलाकाराला उपाशी मरू देणार नाही

राज्यातील कोणत्याही कलाकाराला उपाशी मरू देणार नाही

लोकमत न्यूज नेटवर्क

गारगोटी : गेले दीड वर्ष कोरोनाकाळात मनोरंजनाचे जाहीर कार्यक्रम बंद झाल्याने कलाकारांचे जगणे मुश्किल झाल्याने कलाकार महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन कार्यक्रम सुरू करण्याची परवानगी मागितली. तसेच विविध मागण्यांचे निवेदन मुंबई येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले. यावेळी ठाकरे यांनी ‘कोणत्याही कलाकाराला उपाशी मरू देणार नाही तसेच येणाऱ्या गणेशोत्सवात तिसऱ्या लाटेचा विचार करून सांस्कृतिक कार्यक्रम चालू करण्याची परवानगी दिली जाईल,’ अशी ग्वाही दिली.

यावेळी संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष अनिल मोरे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष जयवंतराव वायदंडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष शोभा पाटील, सोलापूर जिल्हाध्यक्ष गिरिधर इंगोले, सोनल डोईफोडे, आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

फोटो : २७ गारगोटी कलाकार निवेदन

कार्यक्रम सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री ठाकरे यांना देताना अनिल मोरे, जयवंत वायदंडे, सोनल डोईफोडे, आदी उपस्थित होते.

Web Title: No artist in the state will starve