महापालिकेला मिळणार पूर्णवेळ जल अभियंता, आरोग्य अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:23 IST2021-01-23T04:23:53+5:302021-01-23T04:23:53+5:30

कोल्हापूर : महापालिकेच्या सेवेत पूर्णवेळ जल अभियंता आणि आरोग्य अधिकारी मिळणार आहे. प्रशासनाकडून १५ दिवसांपूर्वी राज्य शासनाकडे रिक्त असलेली ...

NMC will get full time water engineer, health officer | महापालिकेला मिळणार पूर्णवेळ जल अभियंता, आरोग्य अधिकारी

महापालिकेला मिळणार पूर्णवेळ जल अभियंता, आरोग्य अधिकारी

कोल्हापूर : महापालिकेच्या सेवेत पूर्णवेळ जल अभियंता आणि आरोग्य अधिकारी मिळणार आहे. प्रशासनाकडून १५ दिवसांपूर्वी राज्य शासनाकडे रिक्त असलेली या पदासाठी प्रतिनियुक्तीवर देण्याचा प्रस्ताव दिला होता. शासनाकडून हिरवा कंदील मिळाला असून, दोन्ही अधिकारी लवकरच महापालिकेत रुजू होणार आहेत.

कोल्हापूर महापालिकेमध्ये गेल्या काही वर्षांपासून अनेक महत्त्वाची पदे रिक्त होती. याचा परिणाम विकासकामांवर होत होता. आता प्रशासकीय पातळीवर रिक्त पदावरील अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जात आहे. दोन उपायुक्त, दोन सहायक आयुक्त अशी महत्त्वाच्या पदावर नियुक्ती झाली आहे.

सध्या आरोग्य अधिकारी पद ठोकमानधनावर भरले आहे, तर भास्कर कुंभार यांच्या बदलीनंतर जल अभियंतापद रिक्त आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतील कार्यकारी अभियंता नारायण भोसले यांच्याकडे जल अभियंता पदाचा अतिरिक्त पदभार दिला आहे. उपशहर अभियंता हर्षजित घाटगे यांच्याकडे प्रकल्प दिले आहेत. मूळ कामासोबत येथील कामे करताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. आता पूर्णवेळ शासन प्रतिनियुक्त अधिकारी येणार असल्यामुळे कामाचा भार हलका होणार असून, पाणीपुरवठा आणि प्रकल्पातील कामे गतीने होण्यास मदत होणार आहे. तसेच आरोग्य अधिकाऱ्यांमुळे आरोग्य यंत्रणा आणखीन सक्षम होणार आहे.

Web Title: NMC will get full time water engineer, health officer