शित्तूर-वारुण ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी नीता पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:36 IST2021-02-26T04:36:05+5:302021-02-26T04:36:05+5:30
शित्तूर-वारुण :शित्तूर-वारुण (ता. शाहूवाडी) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिवसेनेच्या नीता अशोक पाटील, तर उपसरपंचपदी लक्ष्मण मारुती पाटील यांची बिनविरोध निवड झाली. ...

शित्तूर-वारुण ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी नीता पाटील
शित्तूर-वारुण :शित्तूर-वारुण (ता. शाहूवाडी) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिवसेनेच्या नीता अशोक पाटील, तर उपसरपंचपदी लक्ष्मण मारुती पाटील यांची बिनविरोध निवड झाली. शिवसेनेकडे सात, तर जनसुराज्यकडे चार असे संख्याबळ आहे. ग्रामपंचायतीच्या कार्यालयात निवड सभेचे आयोजन करण्यात आले होते. या निवडीच्या अध्यक्षस्थानी नारायण पवार होते. यावेळी नूतन सरपंच, उपसरपंच व नवनिर्वाचित सदस्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी एम. डी. राऊत (सर), ग्रामविकास अधिकारी पी. एन. पाटील, गावकामगार तलाठी ए. ए. खटावकर, नवनिर्वाचित सदस्या विद्या सुतार, कल्पना पाटील, पल्लवी पाटील, वर्षा झेंडे, सदस्य जयवंत डपडे, गणपती धामणकर, आदी मान्यवरांसह ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो :
२५ सरपंच नीता पाटील व उपसरपंच लक्ष्मण पाटील