शहरं
Join us  
Trending Stories
1
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
2
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
3
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सादर होतील हजारो कोटींच्या पुरवणी मागण्या; ८ डिसेंबरपासून अधिवेशनाला सुरवात
4
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
5
एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका
6
GenZमध्ये महाराष्ट्र सरकारची कार्यशैली लोकप्रिय; ६७% तरुणाईला देवेंद्र फडणवीसांवर 'विश्वास'
7
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
8
'बिनशर्त माफी मागा, अन्यथा पाच कोटींचा दावा ठोकणार' महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माजी मंत्री सुलेखा कुंभारे यांना नोटीस
9
Aaditya Thackeray : "साधुग्राम, तपोवन हवा पण भाजपाच्या बिल्डर मित्रांची दादागिरी नाही", आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
10
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
11
महामानवाला अभिवादन! CM फडणवीसांनी केली सरणत्तयं प्रार्थना; PM मोदींनीही वाहिली आदरांजली
12
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
13
America Visa : सोशल मीडियावर एक चूक कराल, तर तुमच्यासाठी बंद होतील अमेरिकेचे दरवाजे! काय आहे नियम?
14
२०२५ ची शेवटची संकष्ट चतुर्थी: ५ उपाय अवश्य करा, चिंतामुक्त व्हा; बाप्पाची अपार कृपा लाभेल!
15
Video - "मी नवरदेव आहे, पण स्वतःच्या लग्नालाच..."; इंडिगोमुळे अडकले प्रवासी, मांडली व्यथा
16
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: विशेष व्रत करा; वर्षभर पुण्य-लाभ, विनायक कल्याण-मंगल करेल!
17
"आमच्या बॅगा कुठायत? घराची चावी त्यात आहे, भिकारी वाटलो का..."; मुंबई एअरपोर्टवर तुफान राडा
18
'रुपयाबद्दल जास्त काळजी करण्याची गरज नाही..,' घसरत्या चलनावर निर्मला सीतारमण काय म्हणाल्या?
19
हुमायूं कबीर यांनी मुर्शिदाबादमध्ये केली बाबरी मशिदीची पायाभरणी, भाजपा-तृणमूलचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप  
20
IND vs SA : जड्डूच्या गोलंदाजीवर फसला बावुमा! कॅच घेतल्यावर कोहलीनं अशी घेतली मजा (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur News: स्पेशल रुम, कॅफेत प्रेमीयुगुलांचे अश्लील चाळे; निर्भया पथकाने छापा टाकताच उडाली खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 14:33 IST

कारवाई होताच प्रेमीयुगुलांची भंबेरी उडाली. त्यांना ताब्यात घेवून त्यांच्या पालकांना समज देण्यात आली.  ​​​​​​​

इचलकरंजी: येथील झेंडा चौक परिसरातील एका कॅफेवर निर्भया पथकाने आज, शुक्रवारी छापा टाकला. कॅफेअड्डा असे त्या कॅफेचे नाव आहे. तेथे जोडप्यांसाठी स्पेशल रुम करुन देण्यात आल्याचे आढळले. या कारवाईत दोन प्रेमी युगुलांना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी कॅफेअड्डाचा मालक संकेत शिवपुत्र हुबळे (वय २५ , रा.कोरोची) आणि व्यवस्थापक शैलेश अनिल चंदुरे (३६, रा.शेळके मळा) या दोघांवर गावभाग पोलिसांनी गुन्हे दाखल केले. कॅफेमध्ये अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. या कॅफेत युवक, युवतींचा वावर असल्याची चर्चा सुरू होती. शहरात कॅफेच्या नावाखाली बेकायदेशीर कृत्ये सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार निर्भया पथकाचे प्रमुख पोलिस उपनिरीक्षक संभाजी भोजकर, व त्यांच्या पथकाने झेंडा चौकातील कॅफे अड्डावर छापा टाकला. कारवाई होताच महाविद्यालयीन प्रेमी युगुलांची तसेच कॅफेमधील जोडप्यांची भंबेरी उडाली. त्यांना ताब्यात घेवून त्यांच्या पालकांना समज देण्यात आली. कारवाईमध्ये कॅफेत सुरू असलेला धक्कादायक प्रकार उघडकीस आला. कॅफेमध्ये अश्लील चाळे करण्यासाठी दोन वेगळ्या स्पेशल रुम, वाढदिवस साजरा करण्यासाठी वेगळी सोय तसेच बाकडे यांचीही सोय करण्यात आल्याचेही पोलिसांच्या निदर्शनास आले. कारवाईची माहिती समजताच शहरातील अनेक कॅफे चालकांनी व्यवसाय बंद ठेवले तर पोलिस ठाण्यातही कॅफे चालक तसेच समर्थक यांची गर्दी झाली होती. ही कारवाई उपनिरीक्षक संभाजी भोजकर, पोकॉ सिराजभाई, महादेवी पुजारी, प्रियंका चौगुले, सिध्दांत शेटे आदींच्या पथकाने केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Cafe Raided: Obscene Acts, Special Rooms Uncovered; Uproar Ensues

Web Summary : Ichalkaranji cafe raided; special rooms for couples found. Police arrested two couples and booked the owner and manager for providing space for indecent acts. The raid exposed illegal activities under the guise of a cafe, causing a stir in the city.