शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

बहुजनांनी साधनसंपत्तीतील वाटा मागावा, ज्येष्ठ विचारवंत डॉ. आनंद मेणसे यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2023 13:52 IST

कोल्हापूर : देशातील नव्वद टक्के साधनसंपत्ती फक्त दहा टक्के लोकांकडे एकवटली आहे. यामुळे सर्व बहुजनांवर संकट येत आहे. मोठमोठ्या ...

कोल्हापूर : देशातील नव्वद टक्के साधनसंपत्ती फक्त दहा टक्के लोकांकडे एकवटली आहे. यामुळे सर्व बहुजनांवर संकट येत आहे. मोठमोठ्या कारखान्यांमध्ये रोबोटिक तंत्रज्ञानामुळे लाखो कामगारांना बेरोजगार व्हावे लागणार आहे. भविष्यात नवीन नोकऱ्या, तसेच रोजगार संधी उपलब्ध होणार नाहीत. सरकारी मालकीचे सर्वच उद्योग सत्ताधारी खासगी लोकांना विकत आहेत. या गोष्टींकडे जनतेचे दुर्लक्ष व्हावे, यासाठी धर्माधर्मांत, जाती-जातीविरोधात लढवले जात आहे. म्हणून सजग बहुजनांनी साधनसंपत्तीतील आपला वाटा मागण्यासाठी लढा उभारायला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. आनंद मेणसे यांनी मंगळवारी येथे केले.बळीराजा महोत्सव व पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. विद्रोही चळवळीत सक्रिय असलेल्या डॉ.माधुरी सुदाम चौगुले, शाहीर रंगराव पाटील आणि चित्रपट समीक्षक अनमोल कोठाडिया यांचा डॉ. मेणसे यांच्या हस्ते सन्मानपत्र शाल व पुस्तक देऊन गौरव करण्यात आला. तिघांनीही पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी दलित मित्र साथी व्यंकाप्पा भोसले, शाहीरभूषण राजू राऊत यांचाही सत्कार करण्यात झाला. महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख याचे टाळ्यांच्या गजरात अभिनंदन करण्यात आले.डॉ.मेणसे म्हणाले की, सरकारने नवीन शैक्षणिक धोरणामुळे शिक्षण बंदी सुरू केली आहे. जे प्राथमिक शिक्षण या भूमीत लोकराजा राजर्षी शाहूंनी सक्तीचे आणि मोफत केले होते. त्याच ठिकाणी सरकार सर्व प्रकारचे शिक्षण खासगी लोकांच्या हाती देत आहे. उठता बसता शिवशाही फुले आंबेडकर यांचे नाव घेणारे सत्ताधारी आपले शिक्षणच बंद करीत आहेत. पुन्हा एकदा बहुजनांना गुलाम करण्याची षडयंत्र आखले जात आहे.महोत्सवाची सुरवात मिरजकर तिकटी येथून सजीव बळीराजाची भव्य मिरवणूक पारंपरिक पद्धतीने धनगरी ढोल, लेझीम पथक व शेकडो माता-भगिनी, बांधवांच्या सहभागाने सुरू झाली. ‘ईडा पीडा टळो, बळीचं राज्य येवो..!’ अशा घोषणा देत मिरवणूक गंगावेशमधील शाहू सत्यशोधक समाजाच्या दारात उभारलेल्या महात्मा जोतिराव फुले सभागृहात विसर्जित झाली. कार्यक्रमाची सुरुवात बळीराजाच्या पायाने दुष्ट वामनाला पाताळात गाढून झाली.महोत्सव समितीचे अध्यक्ष उमेश पोवार म्हणाले, “बळीराजा महोत्सव हा लोकोत्सव करण्यासाठी आगामी काळात अनेक सामाजिक प्रबोधनाचे उपक्रम राबविणार आहे. पुढील वर्षाच्या बळीराजा महोत्सव समितीत युवकांचा खूपच मोठा सहभाग असणार आहे. सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष बाबूराव कदम यांनी स्वागत केले. समितीचे सचिव दिगंबर लोहार यांनी महोत्सवाचा आढावा घेतला. प्राचार्य डॉ.टी.एस्.पाटील यांनी परिचय करून दिला. शफिक देसाई यांनी सूत्रसंचलन केले. रवी जाधव यांनी आभार मानले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर