चंदगड : गुडवळे येथे मुख्य रस्त्याजवळ तब्बल साडे नऊ फूट लांबीचा किंग कोब्रा चंदगड वनविभाग व वन्यजीव रक्षकांमार्फत पकडून सुरक्षित जंगलात सोडला. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने मोटणवाडी - पारगड रस्त्याला पर्यटकांची गर्दी होती. त्यातच गुडवळे गावच्या हद्दीमध्ये मुख्य रस्त्यावर काही पर्यटकांना नागराज (किंग कोब्रा) जातीचा साप आढळून आल्यामुळे रस्त्याने ये-जा करणाऱ्या लोकांनी तिथे गर्दी केली होती. त्याच वेळी तिथून जाणारे वनविभागाचे कर्मचारी शंकर तेरवणकर यांना ही गोष्ट निदर्शनास आली. त्यांनी साप व पर्यटक या दोघांच्या सुरक्षिततेचा विचार लक्षात घेऊन पर्यटकांना तिथून बाजूला करून वरिष्ठांना कळवले. त्यावेळी तिलारीनगर येथे वन्यजीव जनजागृती, तसेच पर्यटकांना निसर्ग मार्गदर्शन करणारे, वन्यजीव अभ्यासक विकास माने यांना पाचारण करण्यात आले. यावेळी माने हे तत्काळ त्या ठिकाणी पोहोचले व वनक्षेत्रपाल तुषार गायकवाड, वर्षदा पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली विकास माने व शंकर तेरवणकर यांनी किंग कोब्रा सापाला पकडून चंदगड वनपरिक्षेत्राच्या हद्दीतील जंगलात मुक्त केले.
Web Summary : A nine-and-a-half-foot King Cobra was found near Kolhapur. Forest officials and wildlife rescuers safely captured the snake and released it back into the wild. Tourists alerted authorities after spotting the cobra near a road.
Web Summary : कोल्हापुर के पास साढ़े नौ फुट का किंग कोबरा मिला। वन अधिकारियों और वन्यजीव बचाव दल ने सांप को सुरक्षित रूप से पकड़कर जंगल में छोड़ दिया। पर्यटकों ने सड़क के पास कोबरा देखने के बाद अधिकारियों को सतर्क किया।