शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या निलोफर आजरेकर महापौरपदी बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 11:41 IST

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या निलोफर आजरेकर यांची अखेर महापौरपदी बिनविरोध निवड झाली आहे. चार वर्षांत बिनविरोध होणाऱ्या आजरेकर या दुसऱ्या महापौर आहेत.

ठळक मुद्देकाँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या निलोफर आजरेकर महापौरपदी बिनविरोधविरोधी भाजप-ताराराणी आघाडीचा निवडणुकीवर बहिष्कार

कोल्हापूर : काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या निलोफर आजरेकर यांची अखेर महापौरपदी बिनविरोध निवड झाली आहे. चार वर्षांत बिनविरोध होणाऱ्या आजरेकर या दुसऱ्या महापौर आहेत.विरोधी भाजप-ताराराणी आघाडीने रविवारी निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचा निर्णय घेतला होता, त्यानुसार कमलाकर भोपळे वगळता सर्व सदस्य अनुपस्थित होते. त्यामुळे आजरेकर यांच्या निवडीची केवळ औपचारिकताच उरली होती. सोमवारी सकाळी ११ वाजता झालेल्या सभेत त्यांची महापौरपदी निवड झाली. ४८ विरुध्द १ अशा मतांनी आजरेकर यांची निवड झाली.राष्ट्रवादीच्या अ‍ॅड. सूरमंजिरी लाटकर यांनी महापौरपदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या या पदासाठी महापालिकेने निवडणूक प्रक्रिया राबविली. काँग्रेस -राष्ट्रवादी आघाडीकडून या पदासाठी कॉँग्रेसच्या निलोफर आश्किन आजरेकर आणि ताराराणी आघाडीच्या अर्चना उमेश पागर यांनी अर्ज केले होते. आज, सोमवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली महापौरपदाची निवडणूक पार पडली. यावेळी आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी उपस्थित होते.दरम्यान, भाजप-ताराराणी आघाडीने निवडीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय रविवारी रात्री घेतला. सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीने गेल्या चार वर्षांमध्ये महापालिकेतील सर्वोच्च अशा महापौरपदाची खांडोळी केल्यामुळे विकासकामांवर परिणाम होत आहे. यामुळे महापौर निवडीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असल्याचे विरोधी पक्षनेते विजय सूर्यवंशी, गटनेते सत्यजित कदम, अजित ठाणेकर यांनी सांगितले. प्रत्यक्षात कमलाकर भोपळे यांनी मतदान प्रक्रियेत भाग घेउन विरोधात मतदान केले.काँग्रेस-राष्ट्रवादी सदस्य सहलीवरून परतलेमहापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य पन्हाळा येथे सहलीवर गेले होते. २८ पेक्षा जास्त सदस्य दोन दिवसांपासून तेथे होते. आज, सोमवारी सकाळी नऊ वाजता ताराबाई पार्क येथील अजिंक्यतारा कार्यालयात ते आरामबसने आले, त्यानंतर आमदार चंद्रकांत जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष आर. के. पोवार, काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण आदी नेत्यांसमवेत फेटे घालूनच ते सभागृहात दाखल झाले.पोलिसांचा प्रचंड बंदोबस्तमहापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या आवारात प्रचंड पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाMayorमहापौरkolhapurकोल्हापूर