निलेवाडी-ऐतवडे खुर्द पूल पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:15 IST2021-07-23T04:15:32+5:302021-07-23T04:15:32+5:30

दोन दिवसांच्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख नद्यांच्या पाणीपातळी सातत्याने वाढ होत आहे. सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे. ...

Nilewadi-Aitwade Khurd bridge under water | निलेवाडी-ऐतवडे खुर्द पूल पाण्याखाली

निलेवाडी-ऐतवडे खुर्द पूल पाण्याखाली

दोन दिवसांच्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख नद्यांच्या पाणीपातळी सातत्याने वाढ होत आहे. सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे. वारणा नदीच्या पाणीपातळीत वेगाने वाढ होत आहे. वारणा नदीवरील निलेवाडी-ऐतवडे खुर्द पूल पाण्याखाली गेला असून वाहतूक बंद झाली आहे. निलेवाडी -कोडोली मार्गावर ही पाणी आले आहे. कोडोली-चिकुर्डे बंधारा यापूर्वीच पाण्याखाली गेला आहे. अजून दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. सुरू असलेल्या पावसाचे प्रमाण व पावसाचा इशारा पाहता पुन्हा गंभीर पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते. नागरिकांनी काळजी घेण्याची आवाहन प्रशासनाने केले आहे.

फोटो: २२ निलेवाडी पूल

कोल्हापूर जिल्ह्यातील निलेवाडी व सांगली जिल्ह्यातील ऐतवडे खुर्ददरम्यान वारणेवरील पूल पाण्याखाली गेला. (फोटो : दिलीप चरणे)

Web Title: Nilewadi-Aitwade Khurd bridge under water