नवख्यांची लढतच ठरणार लक्षणीय....

By Admin | Updated: August 28, 2015 00:54 IST2015-08-28T00:54:44+5:302015-08-28T00:54:44+5:30

महिला आघाडीच्या माध्यमातून त्यांनी महिलांच्या कला-गुणांसह त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला आहे, तर

Nikhil's fight will be significant ... | नवख्यांची लढतच ठरणार लक्षणीय....

नवख्यांची लढतच ठरणार लक्षणीय....

प्रदीप शिंदे- कोल्हापूरविक्रमनगर प्रभाग क्रमांक २२ हा अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित आहे. बदलेल्या प्रभाग रचनेमुळे विक्रमनगर व टेंबलाई मंदिर परिसर या दोन प्रभागांतील काही भाग एकत्र करून हा एक भाग करण्यात आले आहे. सध्या या प्रभागातून इच्छुकांची यादी वाढत जरी असली तरी नवख्याच उमेदवारांमध्ये लक्ष्यवेधी निवडणूक होणार असल्याचे चित्र या प्रभागातून पाहण्यास मिळत आहे. सध्याचा विक्रमनगर प्रभाग हा ‘कष्टकरी व मध्यमवर्गीयांचा प्रभाग’ म्हणून ओळखला जातो. दरवेळीच्या निवडणुकीत या ठिकाणी अपुरा पाणीपुरवठा हाच प्रचाराचा मुद्दा असतो. दरवर्षी उमेदवार निवडून येतात. मात्र, पाण्याचा प्रश्न आजपर्यंत कोणी सोडविला नसल्याची ओरड स्थानिक नागरिकांतून होत आहे.
यंदा या प्रभागातून शोभा कवाळे या काँग्रेसकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. कवाळे यांनी त्र्यंबोली महिला मंडळाच्या माध्यमातून प्रभागात संपर्क ठेवला आहे. गेली १५ वर्षे त्या काँग्रेसच्या कार्यकर्त्या म्हणून काम करत असून त्यांनी येथील नागरी समस्यांसह शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना मिळवून दिला आहे. पल्लवी रामदास जाधव धनंजय महाडिक महिला आघाडीच्या मार्केट यार्डच्या अध्यक्षा आहेत. त्याही यंदा निवडणूक लढविणार आहेत. महिला आघाडीच्या माध्यमातून त्यांनी महिलांच्या कला-गुणांसह त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला आहे, तर त्यांचे पती रामदास जाधव यांचा युवाशक्तीचे ‘संपर्क मित्र’ या माध्यमातून सामाजिक कार्यात पुढाकार असल्याने जाधव कुटुंबीयांचा येथे संपर्क आहे.
विद्यमान नगरसेवक रशीद बारगीर यांचे समर्थक योगेश लांडगे यांच्या पत्नी वर्षाराणी लांडगे या प्रभागातून निवडणूक लढविणार आहेत. योगेश लांडगे यांनी रशीद बारगीर यांच्यासोबत दहा वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना करून दिला आहे. रस्ते असो किंवा पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याने त्यांचाही या प्रभागात चांगला संपर्क आहे.
माजी उपमहापौर मोहन गोंजारे यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस जे उमेदवारी देतील त्यांचा प्रचार करणार असल्याचे गोंजारे यांनी सांगितले. नगरसेवक रशीद बारगीर यांना मानणारा गटही येथे असल्याने त्यांचा पाठिंबा निर्णायक ठरणार आहे.

Web Title: Nikhil's fight will be significant ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.