पती-पत्नीसाठी होणार निकमवाडीची निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:18 IST2021-01-08T05:18:51+5:302021-01-08T05:18:51+5:30

करंजफेण : पन्हाळा तालुक्यातील निकमवाडी गावची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी गावातील नेतेमंडळींसह ग्रामस्थ एकवटले. परंतु गावातील एका व्यक्तीने आपल्याला सदस्यत्व ...

Nikamwadi elections will be held for husband and wife | पती-पत्नीसाठी होणार निकमवाडीची निवडणूक

पती-पत्नीसाठी होणार निकमवाडीची निवडणूक

करंजफेण : पन्हाळा तालुक्यातील निकमवाडी गावची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी गावातील नेतेमंडळींसह ग्रामस्थ एकवटले. परंतु गावातील एका व्यक्तीने आपल्याला सदस्यत्व हवेच, हा हट्ट कायम ठेवत आपल्यासह पत्नीचा अर्ज दाखल केल्यामुळे आता दोन जागांसाठी निवडणूक होणार आहे.

गावात जनसुराज्य व शिवसेना असे पारंपरिक दोन गट आहेत. गावात राजकारण जरी असले तरी विकास कामात गाव कायम अग्रेसर ठरले आहे. यावर्षी एकविचाराने गावकरी एकत्र जमले. यावेळी बावीस उमेदवारांनी इच्छा व्यक्त केली. परंतु गावहिताच्यादृष्टीने ज्येष्ठांचा सल्ला प्रमाण माणून बावीसपैकी सोळा उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून काढता पाय घेतला. त्यामुळे गाव बिनविरोध होणार, याची चर्चा सर्वत्र जोरात रंगली. पण गावातील एका व्यक्तीने आपल्या पत्नीसह दोघांचा अर्ज दाखल करून तो लोकांच्या व नेत्यांच्या संपर्कापासून काही दिवस दूर राहिल्याने शेवटी बिनविरोध संकल्पनेला खो बसला.

Web Title: Nikamwadi elections will be held for husband and wife