शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातून रात्रीची विमानसेवा होणार सुरू, खासदार धनंजय महाडिक यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 15:38 IST

एअर बससारखी मोठी विमाने या विमानतळावर उतरू शकतील

कोल्हापूर : नाईट लँडिंग सुविधा आणि विस्तारित धावपट्टीला भारतीय नागरी विमान उड्डाण प्राधिकरणाने मंजुरी दिल्याने आता कोल्हापुरातून रात्रीची विमानसेवा लवकरच सुरू होणार आहे, अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी मंगळवारी दिली.भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून कोल्हापूरविमानतळावर नाईट लँडिंग सुविधेला मंजुरी मिळाली. विमानतळावरील धावपट्टी १३७० मीटरवरून १९३० मीटर इतकी विस्तारित झाली आहे. त्यामुळे एअर बससारखी मोठी विमाने या विमानतळावर उतरू शकतील. या विस्तारित धावपट्टीला नागरी विमान उड्डाण प्राधिकरणाने मंगळवारी मान्यता दिली. गेल्या आठवड्यात केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेऊन त्यांना कोल्हापूर विमानतळाच्या गरजांची माहिती दिली होती. त्यावेळी त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.या विमानतळावरील ॲप्रन, टॅक्सी-वे, आयसोलेशन-वे उभारण्यास तत्काळ मंजुरी दिली. त्यानंतर नाईट लँडिंग, विस्तारित धावपट्टीला मंजुरी मिळवण्यासाठी प्रयत्नशील होतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे मार्गदर्शन आणि केंद्रीय मंत्री सिंधिया यांच्या सकारात्मकतेमुळे कोल्हापूरचा महत्त्वाचा विषय मार्गी लागला आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या व्यापार, उद्योग, पर्यटनाला चालणार मिळणार असल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले.

कोल्हापूर-मुंबई नियमित सेवेसाठी प्रयत्नशील

कोल्हापूर - मुंबई दैनंदिन विमानसेवेसह अन्य मार्गांवर विमान उड्डाण सुरू व्हावे. रात्रीची विमानसेवा सुरू व्हावी. विमानतळाची नवी इमारत लवकर पूर्ण व्हावी, यासाठी प्रयत्नशील असल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले.

विकासाला चालना मिळणारनाईट लँडिंग, धावपट्टी विस्तारीकरणामुळे कोल्हापूर विमानतळ आणि औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे. या सुविधांच्या मंजुरीसाठी प्रयत्न करणारे केंद्रीय मंत्री सिंधिया, खासदार महाडिक यांना विशेष धन्यवाद देतो. कोल्हापूरहून विविध हवाई सेवांचा विस्तार होण्यास फायदा होणार असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी व्यक्त केली

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAirportविमानतळDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिक