शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: महायुतीत बेबनाव, मंत्री मुश्रीफांविरोधात समरजित घाटगेंचा शड्डू; म्हणाले, पुढच्या शाहू जयंतीला आमदारकीचा गुलाल असेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2024 16:55 IST

''शाहूंच्या कागलची राजकीय विद्यापीठ अशी चुकीची ओळख काही मंडळींनी हेतूपुरस्सर निर्माण केली याची खंत''

गौरव सांगावकर

राधानगरी: सालाबादप्रमाणे पुढच्यावर्षी ही राधानगरीमध्ये शाहू जयंतीसाठी येणार आहे. त्यावेळी विधानसभेच्या निवडणुकीत विजयी होऊन आमदारकीचा गुलाल घेऊनच येणार. मात्र हा गुलाल तमाम जनतेच्या त्यागाचा समर्पणाचा कष्टाचा असेल. यामध्ये कागलकरांच्या बरोबरीने राधानगरीकरांचेही योगदान असेल. हा गुलाल केवळ माझ्या विजयाचा नसेल तर तमाम जनतेच्या विजयाचा  असेल असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत घाटगे यांनी केले. ते राधानगरी धर्मस्थळ येथे शाहू जयंती उत्सवात बोलत होते. घाटगे म्हणाले, शाहूंच्या "कागल"ची राजकीय विद्यापीठ अशी चुकीची ओळख गेल्या पंचवीस वर्षांपासून काही मंडळींनी हेतूपुरस्सर निर्माण केली आहे. याची खंत आम्हाला आहे. येत्या काळात राजर्षी "शाहूं" ची जन्मभूमी असलेल्या आदर्शवत कागलची देशभर ओळख निर्माण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे घाटगे यांनी यावेळी सांगितले. राधानगरी धरणस्थळ हे आमच्यासाठी ऊर्जास्थळ आणि  प्रेरणास्थळ आहे. पाच वर्षांपुर्वी आम्ही शाहू जयंती राधानगरी धरणस्थळी साजरी करत आहोत. या ठिकाणचे पर्यटन वाढावे व या पर्यटनाच्या माध्यमातून शाहूंच्या कर्मभूमीची ओळख सर्वदूर व्हावी हाच येथे जयंती साजरी करण्यामागे आमची भूमिका आहे. त्यामुळे येत्या काळात आपण स्थानिक भुमिपुत्र आणि शाहू महाराजांचे नातेसंबंध दृढ करण्यासाठी प्राधान्य देणार आहोत.यावेळी शाहू कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई, राजे बँकेचे चेअरमन एम.पी .पाटील, राजाराम कारखान्याचे उपाध्यक्ष गोविंद चौगुले, बिद्रीचे माजी व्हा. चेअरमन बाबासाहेब पाटील, भगवानराव काटे, दत्तामामा खराडे, कारखान्याचे सर्व संचालक, शाहू ग्रुपचे पदाधिकारी, कागल राधानगरी येथील शाहू प्रेमी, महिला,युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत प्रास्ताविक संभाजी आरडे यांनी केले तर आभार विलास रणदिवे यांनी मानले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणkagal-acकागलSamarjitsinh Ghatgeसमरजितसिंह घाटगेHasan Mushrifहसन मुश्रीफ