पत्रके बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:52 IST2020-12-05T04:52:34+5:302020-12-05T04:52:34+5:30
कोल्हापूर : येथील केआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयात उद्योगभूषण शिवाजीराव देसाई स्मृती व्याख्यानमालेअंतर्गत आज, शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता काडसिद्धेश्वर स्वामी यांचे ...

पत्रके बातम्या
कोल्हापूर : येथील केआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयात उद्योगभूषण शिवाजीराव देसाई स्मृती व्याख्यानमालेअंतर्गत आज, शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता काडसिद्धेश्वर स्वामी यांचे व्याख्यान होणार आहे. ‘तंत्रज्ञान युगातील सामाजिक भान’ असा त्यांचा विषय आहे. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पांडुरंग शेवाळे, तर ‘केआयटी’चे अध्यक्ष भरत पाटील, उद्योगभूषण शिवाजीराव देसाई प्रतिष्ठानच्या अध्यक्षा शशिताई देसाई प्रमुख उपस्थित असतील.
‘अग्निदिव्य’चे उद्या प्रकाशन
कोल्हापूर : निवृत्त शिक्षण उपसंचालक नानासाहेब माने यांनी लिहिलेल्या ‘अग्निदिव्य : ध्येयवेड्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या कर्तृत्वाची यशोगाथा’ या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी (दि. ५ डिसेंबर) दुपारी चार वाजता पालकमंत्री सतेज पाटील आणि सराेज (माई) पाटील यांच्या हस्ते होणार आहे. आर. के. नगर सोसायटीच्या सभागृहात कार्यक्रम होणार आहे. नानासाहेब माने यांनी शिक्षण विभागात प्रौढ शिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी, एसएससी बोर्डाचे विभागीय सचिव, शिक्षण उपसंचालक, आदी विविध पदांवर काम केले आहे. या सेवाकालातील अनुभवांचे सत्यकथन त्यांनी या पुस्तकामध्ये केले आहे, अशी माहिती डॉ. अरुण शिंदे यांनी दिली.
फोटो (०३१२२०२०-कोल-अग्निदिव्य पुस्तक)