पत्रकांच्या बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:20 IST2020-12-25T04:20:35+5:302020-12-25T04:20:35+5:30

सानेगुरुजी यांना अभिवादन कोल्हापूर : सानेगुरुजी यांना कोल्हापूर जिल्हा सर्वोदय मंडळ, स्वातंत्र्य सैनिक संघटना, खादी ग्रामोद्याेग संघ आणि म. ...

News of the sheets | पत्रकांच्या बातम्या

पत्रकांच्या बातम्या

सानेगुरुजी यांना अभिवादन

कोल्हापूर : सानेगुरुजी यांना कोल्हापूर जिल्हा सर्वोदय मंडळ, स्वातंत्र्य सैनिक संघटना, खादी ग्रामोद्याेग संघ आणि म. दुं. श्रेष्ठी समता हायस्कूल यांच्यावतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी सुंदरराव देसाई, व्ही. डी. माने, सुजय देसाई, सदाशिव मनुगडे, एस. एस. सावंत, आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सखाराम सुतार, एस. एस. तुपद, छायाताई भोसले, सविता देसाई, अरुण मांगुरे, आर. डी. पाटील, पी. के. पाटील उपस्थित होते.

महाराणी ताराराणी यांना अभिवादन

कोल्हापूर : छत्रपती महाराणी ताराराणी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना कमला कॉलेजमध्ये अभिवादन करण्यात आले. ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. क्रांतिकुमार पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. यावेळी प्राचार्या डॉ. तेजस्विनी मुडेकर, उपप्राचार्य प्रा. पी. एस. जाधव, अनिल घस्ते, सुजय पाटील, एस. बी. शिंदे, प्रताप रंगापुरे उपस्थित होते.

Web Title: News of the sheets