सृजनचे राज्यस्तरीय सृजन पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 08:50 IST2021-02-11T04:25:28+5:302021-02-11T08:50:45+5:30
यंदाचा सृजन जीवनगौरव पुरस्कार गडहिंग्लजचे ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत नाईक यांना जाहीर झाला आहे तसेच विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्याचा गौरव ...

सृजनचे राज्यस्तरीय सृजन पुरस्कार जाहीर
यंदाचा सृजन जीवनगौरव पुरस्कार गडहिंग्लजचे ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत नाईक यांना जाहीर झाला आहे तसेच विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून मान्यवरांना राज्यस्तरीय सृजन साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्काराचे १६ वे वर्ष असून याही वर्षी महाराष्ट्रातून ४२ मान्यवरांचे प्रस्ताव आले होते. त्यातील खालील मान्यवरांची निवड करण्यात आली.
विलास पाटील (मुंबई) सहकार भूषण, सागर सावर्डेकर (सावर्डे कागल) यशस्वी उद्योजक, एम. डी. रावण (मुरगूड) सृजन शिल्पकार, जयश्री गायकवाड (इचलकरंजी )उत्कृष्ट प्रशासकीय सेवा,विजय पाटील (शिरगांव राधानगरी) आदर्श शिक्षक, सुषमा पाटील (कोल्हापूर) समाजभूषण, अमृत सुतार (मुंबई) उत्कृष्ट पत्रकार, एम. एस. जाधव (हातकणंगले) साहित्यरत्न, विजय बागडी (कोल्हापूर) उपक्रमशील शिक्षक यांना राज्यस्तरीय सृजन पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. मानपत्र, दीड हजारची ग्रंथ भेट. सन्मानचिन्ह. कोल्हापुरी फेटा. असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्कार सोहळ्यात १० लाख पारितोषिक विजेते दिगंवत पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे तसेच लॉकडाऊन काळात खुल्या काव्य लेखन स्पर्धा घेण्यात आल्या होत्या .त्यांचा बक्षीस वितरण होणार आहे . अशी माहिती अध्यक्ष किरण पाटील यांनी दिली.
यावेळी कार्यवाह संपत चव्हाण अमित कांदळकर, रमेश वारके सर,प्रकाश केसरकर, महादेवी मगदूम, अमरनाथ
शेंडगे, जीवन भांदिगरे आदी सृजन सदस्य उपस्थित होते.